व्हिडीओ गेम खेळायला लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. बाजारात खेळण्यातले व्हिडीओ गेमसुद्धा उपलब्ध असतात. तसेच संगणक, लॅपटॉप, टॅबमध्येही हे गेम्स आपण डाऊनलोड करू खेळू शकतो. पण, आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एका मुलाने अनोख्या गोष्टीपासून संगणकावर खेळला जाणारा व्हिडीओ गेम तयार केला आहे.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ परदेशातील एका मुलाचा आहे. मुलगा व्हिडीओ गेम खेळताना दिसत आहे. दोन्ही हातांचा उपयोग करून हा व्हिडीओ गेममधील पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार करतो. पण, तुम्ही पाहू शकता की, हा व्हिडीओ गेम संगणक, टॅब किंवा मोबाईलवर नव्हे, तर चक्क जुन्या कार्डबोर्डच्या एका बॉक्समध्ये तयार करण्यात आला आहे आणि गेम खेळता यावा म्हणून त्याला प्लास्टिकच्या बाटलीचे झाकणसुद्धा लावण्यात आले आहे. एकदा पाहाच हा व्हायरल झालेला व्हिडीओ.
हेही वाचा…“बाबा मला मारतात कारण…” सात वर्षाच्या चिमुकल्याचा पोलिसांना कॉल, तक्रार वाचून म्हणाल हसावं की रडावं?
व्हिडीओ नक्की बघा :
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात येत आहे की, या मुलाने स्वतःचा एक अनोखा व्हिडीओ गेम तयार केला आहे. मुलाने जुन्या कार्डबोर्डपासून व्हिडीओ गेम तयार करून, प्लास्टिकच्या बाटलीचे झाकण स्क्रोल करण्यासाठी वापरले आहे; जे अगदीच कौतुकास्पद आहे. मुलाने व्हिडीओ गेमचा बारकाईने अभ्यास करून, व्हिडीओ गेममधे दिसणारी दृश्येसुद्धा कार्डबोर्डच्या साह्याने चित्रित केली आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gunsnrosesgirl3 या एक्स ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच हा मुलगा परदेशातील व्हेनेझुएलाचा रहिवासी असून, त्याने स्वतःचा वैयक्तिक व्हिडीओ गेम तयार केल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून मुलाच्या मेहनतीचे आणि टॅलेंटचे भरभरून कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.