आपल्या देशात जुगाडु लोकांची कमतरता नाही. अगदी प्रत्येक मुलामध्ये नवीन आणि आश्चर्यकारक शोध लावण्याची ताकद आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, ज्यामध्ये लोक वेगवेगळे शोध लावताना किंवा अनोखे जुगाड करतात. याआधी काहींनी बाटलीच्या झाकणांपासून बनवलेले कुलूप बनवलंय तर काहींनी आणि चारचाकीही बनवलेली, दरम्यान एका शाळकरी मुलानं असाच एक जुगाड तयार केला आहे. या मुलानं चक्क पाण्याच्या ड्रमपासून वॉशिंग मशीन तयार केल आहे.याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वास्तविक, या व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येते की एका मुलाने आपल्या बुद्धीने एक अद्भुत गोष्ट तयार केली आहे, जी बहुतेक लोक त्यांच्या घरात वापरतात. आता तुम्ही विचार करत असाल की अशी कोणती गोष्ट आहे, तर ही गोष्ट म्हणजे वॉशिंग मशीन. आज शहरातील जवळपास सर्वच घरांमध्ये वॉशिंग मशीन दिसतात. कारण त्यामुळे कोणताही त्रास न होता कपडे तर धुतातच शिवाय आपला वेळही वाचतो. वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुताना तुम्ही इतर अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करू शकता.
हा व्हायरल व्हिडिओ एका शाळेचा आहे, जिथे मुलांचा एक ग्रुप एकत्र उभा दिसत आहे. एका मुलाने पाण्याच्या ड्रमच्या मदतीने स्वस्त आणि टिकाऊ वॉशिंग मशिन बनवल्याचे तुम्ही पाहू शकता. सायकल आणि पाण्याच्या ड्रमच्या मदतीने हे वॉशिंग मशीन तयार करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुलगा आधी एक गलिच्छ कापड दाखवतो आणि नंतर ते ड्रम वॉशिंग मशीनमध्ये टाकतो. यानंतर तो सायकलला पेंडल मारण्यास सुरुवात करतो. तो जितका जास्त पेडल करतो तितक्या लवकर कपडे धुतले जातात.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> बाप बापच असतो! परिस्थितीपुढं हतबल झालेल्या वडिलांनी लेकीला पाठीवर बांधलं अन्; VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
हे सर्व केल्यानंतर, मुलगा ड्रममधून एक कापड काढतो आणि ते दाखवतो, जे चमकदार दिसते. मुलाचा हा अप्रतिम जुगाड पाहून सगळेच त्याचे कौतुक करताना दिसत आहेत. एक यूजर म्हणाला, ‘खूप छान भाऊ. तुम्ही खूप पुढे जाल. ‘ तर दुसरा यूजर म्हणाला, ‘खरोखर माझा देश बदलत आहे’. काही लोकांना हा व्हिडिओ स्क्रिप्टेड आणि बनावट वाटला.