Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच विविध विषयांवरील अधारित व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात कधी भयानक थरकाप उडवणाऱ्या व्हिडीओंचा समावेश असतो, तर कधी आपलं मनोरंजन करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असे व्हिडीओ काही क्षणांत लाखो व्ह्यूज आणि लाइक्स मिळवतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यात दोन लहान मुलं भांडण करताना दिसत आहेत. त्यांच्या या गल्लीतील भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या जगात असा एकही व्यक्ती नसेल जो एकदाही भांडला नसेल. काही जण व्यर्थ कारणामुळे भांडण करतात, तर काही जण स्वतःच्या हक्कासाठी भांडण करतात. अशा विविध कारणांमुळे भांडण झालेलं आपण पाहतो. आजपर्यंत असे अनेक व्हायरल व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील, ज्यात कधी ट्रेनमध्ये तर कधी गल्लीमध्ये महिला किंवा पुरुष भांडताना दिसले असतील. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन लहान मुलं भांडण करताना दिसत आहेत, जे पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
Noida officials ignore elderly man, get stand-up punishment from CEO Watch Viral video
कर्मचाऱ्यांनी केली ही चूक, अधिकाऱ्याने सर्वांना दिली ‘उभे राहण्याची शिक्षा, नक्की घडलं तरी काय? Viral Video पाहून आठवतील शाळेचे दिवस
a child girl cried as young girl asked questions to her
VIDEO : तरुणीचा प्रश्न ऐकताच चिमुकली ढसा ढसा रडायला लागली.. नेटकरी म्हणाले, “थेट काळजावर..”
Aishwarya Rai And Abhishek Bachchan attends aaradhya school event
Video : लेकीच्या शाळेत जोडीने पोहोचले ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन! सोबतीला होते ‘बिग बी’; ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका गल्लीमध्ये एक लहान मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये खेळता खेळता भांडण सुरू झालं असून यावेळी ते एकमेकांना बरंच काही बोलताना दिसत आहेत. यावेळी अचानक ती लहान मुलगी, मुलाला तू माझ्यापासून सावध राहा, मी तुला मारून टाकेन असं म्हणते. चिमुकलीचं हे बोलणं एकूण आजूबाजूला जमलेली तरुण मुलं मोठमोठ्याने हसू लागतात. त्यानंतर दोन्ही लहान मुलं मारामारी सुरू करतात.

हेही वाचा: ‘अशी मुलं नको रे देवा…’ फ्रेंच फ्राईज खाता खाता चिमुकल्यांनी केलं असं काही…VIDEO पाहून माराल कपाळावर हात

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @inayashadab3786 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत १७ मिलियन व्ह्यूज आणि दोन मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “यांना शाळेत पाठवा कोणीतरी”, तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “आहेस केवढी, बोलतेस किती?”, तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “त्या बिचाऱ्याला मारू नकोस गं”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “मजेशीर व्हिडीओ.”

Story img Loader