Viral Video: सोशल मीडियाचे जग आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे आहे. कारण- इथे रोज अशा गोष्टी पाहायला मिळतात, ज्याची आपण अनेकदा कल्पना देखील करत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओंमधून नेहमीच काहीतरी नवीन पाहायला मिळते. ज्यात कधी कोणी देसी जुगाड करताना दिसते तर कोणी हटके कॉम्बिनेशनच्या रेसिपी ट्राय करत असते. हे लोक कमी वेळेत प्रसिद्ध मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन व्हिडीओ बनवतात. अनेकदा यासाठी काही प्राण्यांचा देखील वापर केला जातो.
सोशल मीडियावर प्राण्यांचे देखील खूप व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. ज्यात कधी काही प्राणी डान्स करताना दिसतात तर कधी भांडणं करताना दिसतात. दरम्यान, नुकत्याच व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एक चिंपांझी असं कायतरी करतोय जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
चिंपांझीला प्राण्यांमध्ये सर्वात बुद्धीमान प्राणी म्हणून ओळखले जाते. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चिंपांझी एका ठिकाणी निवांत बसला असून यावेळी त्याच्या हातामध्ये सिगारेट दिसत आहे, यावेळी तो एखाद्या व्यक्तीलाही लाजवेल अशा स्टाईलमध्ये सिगारेट ओढत आहे. चिंपांझीची सिगारेट ओढण्याची स्टाईल अगदी हटके असून तो सिगारेट ओढून नाकातून धूर देखील काढत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने व्हिडीओखाली, “या व्हिडीओला कॅप्शन द्या”, असं देखील लिहिलं आहे.
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @earth.reel या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास सोळा हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत तसेच बऱ्याच लोकांनी याला लाइक देखील केलं आहे. या व्हिडीओवर काही युजर्स कमेंट करताना देखील दिसत आहेत. ज्यात एकाने लिहिलंय की, “प्लीज याच्या हातातून सिगारेट काढून घ्या”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “माणसांप्रमाणे यालाही वाईट सवय लागली”. तर आणखी एकाने लिहिलंय की, “कृपया प्रसिद्धीसाठी अशा गोष्टी करु नका”.
पाहा व्हिडीओ:
दरम्यान, यापूर्वी देखील अशा प्रकराचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही वर्षांपूर्वी समोर आलेल्या एका बातमीनुसार एक मादी चिंपांझी एक दोन नव्हे तर तब्बल चाळीस सिगारेट दररोज ओढायची. प्राणिसंग्रहालयात तिला लोकांच्या मनोरंजनासाठी सिगारेट ओढायला शिकवले गेले होतो पण नंतर हळूहळू तिला सिगारेटचे व्यसन जडले, त्यावेळी या मादी चिंपांझीला पाहण्यासाठी खूप लोक आवर्जून यायचे. त्यामुळे ती प्राणीसंग्रहालयात आकर्षणाचे केंद्र बनली होती.