चीनमध्ये मुलांना त्यांच्या लहान वयापासूनच ट्रेनिंग दिलं जातं, हे तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल. त्यांच्यावर चिनी नागरिकांप्रमाणे संस्कार केले जात आहेत. ज्यामुळे ती मुलं भविष्यात चीन देशाची ताकद बनतील. चीनमध्ये लहान मुलांना व्यायामाचे प्रशिक्षण देतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी या चिनी लहान मुलांना ‘ छोटे निन्जा’ असं नाव दिलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये जवळपास ५ ते ६ वर्षाच्या वयोगटातील लहान मुले बाहेर बसलेली दिसत आहेत. दोन्ही हातांनी बास्केटबॉल जमिनीवर फेकत हे सर्व छोटे निन्जा एकसंधपणे व्यायाम करताना दिसत आहेत. यातला एक ही छोटा निन्जा मागे पुढे न होता सर्वच जण एकाच वेळी एकसारखा व्यायाम करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून काही वेळासाठी हे लहान मुलं नाही तर जणू काही मशीनच व्यायाम करत आहेत असा भास होऊ लागतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सुरूवातीला हे लहान मुलं व्यायाम करत आहेत, यावर विश्वासच बसत नाही. ही सर्व लहान मुलं अगदी मन लावून व्यायाम करताना दिसत आहेत. शाळेतल्या शारिरीक शिक्षण वर्गात लहान मुलांना हे प्रशिक्षण दिलं जातं.

आणखी वाचा : OMG! वॉशिंग मशीनमध्ये घुसली मांजर, गोल गोल फिरत राहिली आणि…. पुढे काय झालं, पाहा VIRAL VIDEO

माजी नॉर्वेजियन मुत्सद्दी एरिक सोल्हेम यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. हे चिनी विद्यार्थी त्यांच्या क्रीडा क्षमता दाखवत आहे. व्हिडीओ शेअर करताना सोल्हेम यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “वाह! बालवाडी शारीरिक शिक्षण वर्ग.” हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येतोय. हा व्हिडीओ लोक उत्सुकतेने पाहताना दिसत आहेत.

आणखी वाचा : या चिमुकल्याने शोधून काढली कोकरूची आई, हा VIRAL VIDEO पाहून तुमचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावतील

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : पृथ्वी ते ब्रम्हांडापर्यंतचा प्रवास तुम्ही कधी पाहिलाय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडीओ शेअर होताच इंटरनेटवर खळबळ माजली आहे. ट्विटर युजर्स या व्हिडीओचा आनंद घेताना दिसत आहे. तर एका युजरने या लहान मुलांचे वर्णन “छोटे निन्जा” असं केलं आहे. दुसर्‍या आणखी एका युजरने सांगितले की हे लहान मुलं खूप टॅलेंटेड आहेत.