Viral Video: आजकालची लहान मुलं खूप अॅडव्हॉन्स झाली आहेत. बदलत्या काळानुसार पुढची पिढी आपली संस्कृती किती प्रमाणात जपेल याची काळजी अनेक जण सतत व्यक्त करत असतात. पण म्हणतात ना, आपण मुलांना जे संस्कार लहानपणापासून देतो, त्यातूनच उद्याचे भविष्य घडवता येते. आपल्या पुढची पिढी आपली संस्कृती जपेल की नाही असा विचार करण्यापेक्षा त्यांना लहानपणापासूनच त्यांच्या मनात संस्कृतीबद्दल प्रेम निर्माण करायला हवं. अशी जिवंत उदाहरणं अनेकदा आपण आजही पाहतो. ज्या घरांमध्ये लहान मुलं देवाच्या पाया पडतात, श्लोक म्हणतात, सण-समारंभ साजरे करतात. दरम्यान, आता अशाच एका लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यात तो भजनामध्ये दंग झाल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाला खूप महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. सोशल मीडियामुळे वारकरी संप्रदायातील व्यक्तींचे कीर्तन, भजन अनेकदा सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असते. बऱ्याचदा यामध्ये लहान लहान मुलंही भजनात दंग झालेली दिसतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील एक लहान मुलगादेखील भजनात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shocking video lion and leopard clashed on a tree thrilling fight video went viral
VIDEO: बापरे! सिंहीण करत होती बिबट्याची शिकार, पण तेवढ्यात…तुम्ही कल्पनाही केली नसेल असा झाला शेवट
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Rohit Pawar angry on Fadnavis Govt as after 35 days Santosh Deshmukh killers not punished Brother Dhananjay protesting
“न्याय देणारी व्यवस्था आरोपीला वाचवण्यासाठी…”, धनंजय देशमुखांच्या आंदोलनानंतर रोहित पवारांचा सरकारवर संताप
Gulabrao Patil insta
जळगावचं पालकमंत्रिपद पुन्हा गुलाबराव पाटलांकडेच? घोषणेआधीच मोठं वक्तव्य; विरोधकांना दमबाजी करत म्हणाले…
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
Suresh Dhas
Suresh Dhas : …अन् भरसभेत सुरेश धसांनी आकाचा फोटोच दाखवला; म्हणाले…

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका मंडपामध्ये भजन सुरू असून सर्व जण टाळ, मृदुंगाच्या गजरात लीन झालेले आहेत. यावेळी स्टेजच्या समोर एक लहान मुलगा हातात वीणा घेऊन टाळ, मृदुंगाच्या तालावर ठेका धरताना दिसला. त्या मुलाकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. शिवाय त्याचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: ‘श्वानापुढे बिबट्या हरला…’ क्रूर हल्ला करूनही बिबट्याबरोबर असं काही घडलं.. पाहा घटनेचा थरारक VIDEO

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @satish_mandap_and_sound_plus या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १.६ मिलियनहून अधिक व्ह्युज आणि एक लाखांहून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर एका युजरने लिहिलेय, “नाद पाहिजे नादाशिवाय काही नाही.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “खूप खूप छान..राम कृष्ण हरी.. छोटे माऊली” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “वारकरी संप्रदायाचे संस्कार, राम कृष्ण हरी” आणखी एकाने लिहिलेय, “खूप छान.”

Story img Loader