man comes under parked car viral video: अपघात कधीही आणि कुठेही होऊ शकतात. त्यामुळे माणसाने नेहमी सतर्क राहिले पाहिजे. अनेक अपघात हे किरकोळ असतात आणि त्यातून लोक शिकतात आणि भविष्यात ते सावध राहतात. पण काही अपघात शिकण्याची संधीच देत ​​नाहीत. कारण माणूस त्याची चूक सुधारण्यासाठी जिवंतच राहत नाही. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात असाच एक अपघात घडलाय. या घटनेत एक माणूस पार्क केलेल्या कारसमोर आला आणि त्यानंतर त्याच्यासोबत जे घडले ते फार धक्कादायक आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा हादरून जाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अतिशय भयानक आणि धक्कादायक आहे. गेल्या काही काळपासून ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या कारची क्रेझ प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा कार्सना दिल्लीसारख्या मेगासिटीमध्ये बंपर-टू-बंपर ट्रॅफिकमध्ये गाडी चालवणे खूप सोपे असते. या कार्समध्ये ड्रायव्हरला क्लच पेडल आणि गिअर शिफ्टर वारंवार दाबण्याची गरज न पडत नाही. त्यामुळे या कार सर्वसाधारणपणे ड्रायव्हिंग करताना आराम देतात. परंतु ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कार वापरण्यासाठी विशिष्ट प्रकारची कौशल्य आवश्यक असतात. विशेषत: दुरुस्तीच्या दुकानात. पण एका मेकॅनिकने हे कौशल्य एका धक्कादयक घटनेतून अवगत केलं. या घटनेत त्याला कारने चिरडले. ही कार ऑटोमॅटिक कार असल्याचं सांगण्यात येतंय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ज्वालामुखीतून लाव्हा बाहेर पडत होता अन् लोक स्माईल देत सेल्फी काढत होते…

या व्हिडीओमध्ये एका शॉपसमोर कार उभी आहे. हे शॉप बंद असून दुकानाचे शटर डाउन असलेलं दिसत आहे. एक महिला एका मुलाला कडेवर घेऊन फेऱ्या मारताना दिसतेय. आणखी एक जण बाजुला उभा असलेला दिसत आहे. एक माणूस कारमध्ये काहीतरी ठीक करताना दिसतोय. तो कारचे बोनेट उघडतो आणि पुन्हा तिच्या आत पाहू लागतो. कारमध्ये दुरूस्तीमध्ये हा व्यक्ती गुंतलेला असताना अचानक कार आपोआप पुढे येते आणि धाडकन त्या व्यक्तीच्या अंगावर जाते. कारचा वेग इतका जास्त होता की ती समोरच्या शटरमध्ये घुसली. हे पाहून आजुबाजूचे त्याच्या मदतीसाठी पुढे येतात आणि लगेच त्या व्यक्तीला बाहेर काढलं जातं. त्यानंतर त्या व्यक्तीचे काय झालं हे अद्याप कळलं नाही. पण ज्या प्रकारे आतून लोकांच्या ओरडण्याचे आवाज येत आहेत, त्यावरून त्याचा मृत्यू झाल्याचे समजते.

आणखी वाचा : दिव्यांग मुलाला ट्रेनमध्ये चढण्यासाठी मदत करणाऱ्या आरपीएफ अधिकाऱ्याचा VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : नशेत धुंद महिलेचा VIDEO VIRAL, उभंही राहता येत नव्हतं….

हा व्हिडीओ दीपक प्रभू यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. या व्हिडीओला आतापर्यंत २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने सांगितले की गाडी न्यूट्रलवर नाही, त्याने स्वतः चेक करण्याऐवजी मेकॅनिकला बोलावायला हवे होते. एकाने सांगितले की मॅन्युअल कार ऑटोमॅटिक कारपेक्षा चांगली आहेत. काही यूजर्सनी सुचवले की अशा कारमध्ये नेहमी हँडब्रेक लावला पाहिजे.