Viral Video: दररोज रस्ते अपघातात शेकडो लोकांना आपला जीव आपला जीव गमवावा लागतो. अतिवेगाने वाहन चालवणे, ओव्हर टेक करणे, स्टंटबाजी करणे तर हेलमेट न घालणे आदी अनेक कारणांमुळे अपघात होत असतात. त्यामुळे कायद्याचे पालन न केल्यास वाहतूक पोलीस चालान कापतात. त्यामुळे हेल्मेट घालणे हा कायदा आहे व आणि कायद्याचे पालन हे प्रत्येक नागरिकांकडून व्हायलाचं पाहिजे असे वाहतूक पोलिसांकडून सांगितले जाते. तर आज सोशल मीडियावर हेल्मेट संबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ; या व्हिडीओत उन्हापासून संरक्षण आणि कायद्याचे पालन करताना दिसली आहे.
व्हायरल व्हिडीओ कानपूरचा आहे असे सांगण्यात येत आहे. दुचाकीवरून एक व्यक्ती प्रवास करीत असते. यादरम्यान तिला अनोख्या पद्धतीने हेल्मेट घातलेली एक व्यक्ती दिसते. महिलेनं हेल्मेट अशा पद्धतीनं घातलं आहे की, मागून तुम्हाला क्लासिक गेम पॅकमॅनच्या (classic game Pacman) पात्राचं जणू काही दुचाकी चालवताना दिसतं आहे. एकदा तुम्हीसुद्धा पाहा हा व्हिडीओ.
हेही वाचा…गाडीदुरुस्तीच्या बहाण्याने चोरायला गेला पाकीट; पोलिसांनी पाकीटमारास घडवली अद्दल, पाहा VIDEO
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, प्रत्यक्षात महिलेने हेल्मेट उलटे घातलेले असते. त्यामुळे त्याचा आकार गेमच्या पात्राप्रमाणे दिसत होता. उलटं हेल्मेट घालून महिला नक्की दुचाकी चालवतेयं कशी हे पाहून दुचाकी चालवणाऱ्या अज्ञात व्यक्तीने हे दृश्य स्वतःच्या मोबाईलमध्ये कैद करून घेतलं आणि सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @up78_vlogs_motovlogs या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. गाडीच्या नंबर प्लेटवरून हा व्हिडीओ कानपूरचा आहे हे समजून येत आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. काही जण फक्त हे प्रसिद्धीसाठी केलं असे म्हणत आहेत. तर अनेक जण ‘असं आम्ही लहानपणी करायचो’ ; आदी अनेक कमेंट व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत.