प्रत्येकाला प्राण्यांचे व्हिडीओ आवडतात! गोंडस प्राणी खेळतानाचे गोंडस व्हिडीओ साऱ्यांनाच मोहून घेतात. प्राण्यांचे गोंडस व्हिडीओ पाहून तुमचा दिवस खऱ्या अर्थाने सुरू झाल्याची भावना मनात येते. हे व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल आल्याशिवाय राहत नाही. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ बर्फात खेळणाऱ्या हत्तीच्या पिल्लाचा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मॉस्को प्राणीसंग्रहालयात चित्रित केलेल्या य व्हिडीओमध्ये हत्तीच्या पिल्लाचा एक गट बर्फात खेळताना आणि आनंद लुटताना दिसत आहे. मोठे हत्ती त्यांच्या सोंडेने बर्फाभोवती फेरफटका मारताना पहायला मिळत आहे. हत्तीचा एक पिल्लू बर्फावर सरकत आनंद घेताना दिसून येत आहे. ही आनंददायी क्लिप तुम्हाला सुखद अनुभव देणारी आहे. हा व्हिडीओ पाहताना तुम्ही स्वतः बर्फात त्यांच्यासोबत खेळल्यासारखं वाटू लागतं.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : सासरी जाताना नवरीचा असा अवतार पाहून साऱ्यांना धक्का बसला, मग माहेरच्यांनी काय केलं ते पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : धावती ट्रेन पकडत असताना तोल गेला, मग झालं असं काही की तुम्हीही म्हणाल चमत्कार!

Reuters नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. यात हत्तीचं पिल्लू बर्फाचा आनंद घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही आपला सगळा ताण विसरुन नक्की आनंदीत व्हाल. अगदी लहान बाळाप्रमाणे बर्फात खेळणारं हे हत्तीचं पिल्लू सोशल मीडियावर लाखो लोकांचं मन जिंकून घेत आहे. हा व्हिडीओ लोकाना खूपच आवडू लागला आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : टांझानियाच्या ‘त्या’ तरूणाने Nora Fatehi ला दिली तगडी टक्कर! ‘Dance Meri Rani’ गाण्यावरचे डान्स मूव्ह्स पाहून तुम्ही व्हाल थक्क!

दरम्यान, सोशल मीडियावर सतत कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. मात्र प्राण्यांच्या व्हिडीओला सोशल मीडियावर विशेष पसंती मिळते. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत हत्तीचं पिल्लू प्रचंड गोड असून आपण त्याच्या प्रेमात पडलो असल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या असून काहींनी तर हा व्हिडीओ पाहून सगळा ताण-तणाव गेल्याचं कमेंटमध्ये म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video clip of baby elephant playing with her siblings in snow goes viral day will be seen by watching cute video prp