Viral Video: सोशल मीडियावर विविध प्रसंगांशिवाय अनेकदा अपघातांचेही अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. जे समोर येताच काही क्षणांत लाखो व्ह्युज मिळवितात. आजपर्यंत बाईक चालविणाऱ्या तरुण-तरुणींचे असे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. त्यामध्ये अनेकदा ते हेल्मेट न घालताच, बाईक चालविताना दिसतात. अशा चालकांवर पोलिसांकडून पद्धतशीरपणे दंड वसूल केला जातो. पण, तरीही असे अनेक लोक असतात जे मुद्दाम बाईक चालविताना हेल्मेटचा वापर करीत नाहीत आणि त्यांची हीच मस्ती कधीतरी त्यांच्या जीवावर उलटते. अशा अनेक घटना आपण आजपर्यंत पाहिल्या आहेत. दरम्यान, आता काँग्रेस पक्षाच्या युवा नेता असलेल्या रोशनी कुशल जयलनाल यांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यामध्ये त्या हेल्मेट न घालताच बाईक चालवताना दिसत आहेत.

बाईक चालवताना व्हिडीओ काढण्यासाठी जीवघेणे स्टंट करणं, हेल्मेट न घालणं यामुळे आजपर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. अशा घटनांचे गांभीर्य पोलिसांव्यतिरिक्त आपल्या घरातील मंडळी सांगतात. मात्र, तरीही अलीकडचे तरुण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काँग्रेस पक्षाच्या युवा नेता असलेल्या रोशनी कुशल जयस्वाल यांनी ही चूक केल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरीदेखील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करीत आहेत.

रोशनी कुशल जयस्वाल यांचा हा व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील असून, त्या रात्रीच्या सुमारास आपल्या मैत्रिणीसोबत बाईकवर बसून फिरताना दिसत आहेत. यावेळी त्यांची मैत्रीण त्या बाईकवर मागे बसल्या होत्या. मुख्य म्हणजे बाईक चालविताना या दोघींनीही हेल्मेट घातले नव्हते. त्याशिवाय त्या बाईक चालवितानाचा व्हिडीओदेखील शूट करीत होत्या. हा व्हिडीओ स्वतः त्यांनी त्यांच्या X(ट्विटर) अकाउंटवरून शेअर केला आहे. त्यावरील कॅप्शनमध्ये, ‘हार्ले डेव्हिडसनवर मी आणि मैत्रीण बाईक रायडिंग करताना’, असे लिहिले आहे.

हेही वाचा: याला म्हणतात डोकं! भटक्या कुत्र्यांपासून वाचण्यासाठी तरुणानं लढवली शक्कल; VIDEO पाहून पोट धरून हसाल

पाहा व्हिडीओ:

रोशनी कुशल जयस्वाल यांचा हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “या दोघींनीही हेल्मेट घातले नाही; त्यांच्यावर कडक कारवाई करा.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “हेल्मेट नाही घातलं म्हणजे यांच्याकडून दंड घ्यायला हवा”. तर तिसऱ्या युजरने लिहिलेय, “यूपी पोलिसांचे लक्ष कुठे आहे?”, तसेच आणखी इतर युजर्स हेल्मेट न घालत्यामुळे रोशनी यांना ट्रोल करताना दिसत आहेत.

या व्हिडीओवर आतापर्यंत पाच लाखांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. त्याशिवाय हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. यापूर्वीदेखील रोशनी यांचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.