पोलीस ड्यूटी करत असताना एका ऑटो चालकाला रोखणाऱ्या एका पोलीस अधिकऱ्याच्या अंगावर गाडी घातली. ही धडक इतकी भीषण होती, हा पोलिस थेट हवेतच उडाला. त्यानंतर काही अंतर फरफटत गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ चेन्नईमधल्या नंदमबक्कम भागातील माउंट पूनमल्ली चौकातला असल्याचं सांगण्यात येतंय. नंदमबक्कम पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक पोनराज आणि एक महिला कॉन्स्टेबल नाकाबंदीसाठी वाहने थांबवत असताना सोमवारी रात्री ही घटना घडली. भरधाव वेगाने जाणारी ऑटो दिसल्यावर पोलिस उपनिरीक्षक पोनराज यांनी ऑटोला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, ऑटो ड्रायव्हर त्याच्यासाठी थांबला नाही आणि थेट पोलिसाच्या अंगावर ऑटो नेली.
आणखी वाचा : तरुणांनी रस्त्यावर घातला गोंधळ, मग पोलिसांनी असा शिकवला धडा, पाहा VIRAL VIDEO
ही धडक इतकी जोरात होती की यात पोनराज ऑटोला धडकून थेट हवेतच उडाला. अपघातानंतर रिक्षाचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, इतर पोलीस अधिकारी पोनराजच्या बचावासाठी आले आणि त्यांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेची व्हिडीओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेक नेटकऱ्यांनी हे फुटेज शेअर केले आणि रिक्षाचालकावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली.
आणखी वाचा : या माकडाच्या स्माईलची साऱ्या जगाला भुरळ पडली, VIRAL VIDEO पाहून तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : लग्नातला नागिन डान्स नव्हे तर खऱ्या किंग कोब्राचा रोमँटिक डान्स, VIRAL VIDEO एकदा पाहाच
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी चालकाला पकडण्यासाठी शोध सुरू केला आहे. फरार चालकाला पकडण्यासाठी पोलीस अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. ही सर्व घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ पाहून लोक ऑटो रिक्षाचालकाच्या अटकेची मागणी करत आहेत.