प्री-वेडिंग फोटोशूट सध्या जगभरात ट्रेन्डिंगवर आहे. आपल्या होणाऱ्या जोडीदारासोबत चांगले फोटो काढण्यासाठी, आयुष्यभर लक्षात राहतील अशा आठवणी आपल्या गाठिशी राहाव्यात यासाठी वेगवेगळे जोडपे वेगवेगळ्या युक्त्या काढत आपली प्री-वेडिंग फोटोशूट प्लान करतात. सध्याच्या तरुणाईला ‘प्री- वेडिंग’चे वेड लागले आहे. लग्नाआधीच्या या ‘शूट’मध्ये नव वधू- वरासाठी फिल्मी दुनिया वास्तवात उतरवण्याचा रोमँटिक ट्रेड सुरू आहे. हे प्री वेडिंग फोटोशूट केल्याशिवाय जणू लग्नच पूर्ण होत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. असंच एक अजब-गजब प्री-वेडिंग फोटोशूट करणारं एक जोडपं सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय ठरतंय. कारण या जोडप्यानं चक्क बुलेटवर प्री वेडींग फोटोशूट केलं.

सध्या सर्वत्र लगीन सराई सुरू झाली आहे. त्यामध्येच प्री वेडींग फोटोशूट हा विषय सध्या चर्चेत आहे. आपलेही सेलिब्रिटींप्रमाणे फोटोशूट व्हावे अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते, ही इच्छा लग्नसमारंभामध्ये पूर्ण केली जाते. त्यातही प्री वेडिंग फोटोशूट हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून ट्रेंडमध्ये आहे. यामध्ये लग्नाच्या काही दिवस आधी वेगवेगळ्या थीम ठरवून शूट केले जाते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका जोडप्यानं चक्क रॉयल इनफिल्डवर प्री वेडींग फोटोशूट केलं आहे. यामध्ये तरुणी बुलेटच्या टाकीवर बसलेली दिसतेय.

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Viral video: करावं तसं भरावं! म्हशीला लात मारली अन् दुसऱ्याचं क्षणी झाली अशी अवस्था

खरं तर, यापूर्वीही सोशल मीडियावर असे काही व्हिडिओ समोर आले होते. ज्यामध्ये कपल रस्त्यावर हलगर्जीपणा करत बाइक चालवताना दिसायचे. यादरम्यान मुली बाईकच्या पेट्रोल टाकीवर बसलून आपल्या जोडीदाराला मिठी मारताना दिसत होत्या. अशांवर कारवाई सुद्धा झाली. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येही अशाच प्रकारे प्री-वेडिंग फोटोशूट करण्यात आले आहे. इंस्टाग्रामवर योगेश भोसले नावाच्या व्यक्तीने या फोटोग्राफी पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये कपल काळ्या रंगाच्या रॉयल एनफील्ड बुलेटवर बसलेले दिसत आहे. दरम्यान, त्याचे प्री-वेडिंग फोटोशूट करणारा फोटोग्राफर त्याच्या कॅमेऱ्याने कारमध्ये त्याचे फोटो काढताना दिसत आहे. जे पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Story img Loader