Viral Video: आजकाल सोशल मीडियावर प्रेमाच्या नावाखाली अश्लील कृत्य करणाऱ्या अनेक जोडप्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओंमध्ये काही जोडपी मर्यादा ओलांडून सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये करताना दिसतात. त्यांच्या या कृतीमुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो, पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ही जोडपी एकमेकांच्या प्रेमात इतकी बुडालेली असतात की आपण कुठे आहोत, याचं भानदेखील त्यांना उरत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे, ज्यात रोमान्स करण्यात अखंड बुडालेल्या जोडप्याचा अपघात झालेला पाहायला मिळत आहे.
आजपर्यंत सोशल मीडियावर अशा अनेक जोडप्यांचे व्हिडीओ व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. ज्यात कोणी बसमध्ये, कोणी ट्रेनमध्ये, रस्त्यावर अशा विविध सार्वजनिक ठिकाणी कशाचेही भान न ठेवता अश्लील कृत्य करतात. त्यांच्या अशा कृत्यामुळे आसपास वावरणाऱ्या नागरिकांना त्रास होतो. अनेकदा अशा जोडप्यांची नागरिक हकालपट्टीही करतात. दरम्यान, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील जोडप्याला बिल्डिंगच्या बाल्कनीत उभं राहून रोमान्स करणं जीवावर बेतलं आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण-तरुणी बिल्डिंगच्या बाल्कनीमध्ये उभे राहून रोमान्स करताना दिसत आहेत. यावेळी ते रोमान्स करण्यात अखंड बुडून जातात, त्यामुळे बाल्कनीच्या कट्ट्यावर बसलेल्या प्रियकराचा मागच्या बाजूला तोल जातो, यावेळी तो स्वतःला सावरण्यासाठी प्रेयसीचा हात पकडतो, पण दोघेही मागे पडतात. परंतु, मागच्या बाजूला ४-५ फुटांच्या अंतरावर पत्रा लावला असल्याने ते वाचतात. सध्या त्यांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @hellozindgi__ या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर एक मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तर एका युजरने लिहिलंय की, “काय मूर्ख आहेत, सार्वजनिक ठिकाणी का करतात असं.” तर दुसऱ्याने लिहिलंय की, “हा समाज बिघडतोय.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “वेड्यांचा बाजार आहे हा.”