Bike Stunt Viral Video: सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. या माध्यमावर स्टंटबाजीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आपणही फेमस व्हावे यासाठी बरेचसे लोक स्टंट करायचा प्रयत्न करतात. पण व्हायरल होण्याच्या नादात ते स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालत असतात. काही वेळेला फसलेल्या स्टंट्सचे व्हिडीओदेखील व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. सध्या ट्विटरवर एका व्हिडीओची मोठी चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्या प्रेयसीला मांडीवर घेऊन बुलेट चालवत असल्याचे दिसते.
बुलेटवर सुरु होता रोमान्स
हा व्हिडीओ उत्तरप्रदेश राज्याची राजधानी लखनऊ शहरातील आहे असे म्हटले जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण रस्त्यावरुन भरधाव बुलेट चालवत आहे. त्याने प्रेयसीला बुलेटच्या पुढच्या बाजूला बुलेटच्या टाकीवर बसवले आहे. ती अक्षरक्ष: त्याच्या मांडीवर बसल्याचे दिसते. त्याने उजव्या हाताने प्रेयसीची मांडी पकडली आहे आणि डाव्या हाताने त्याने बुलेटचे हॅंडल पकडले आहे. त्या दोघांनीही हॅल्मेट घातलेले नसल्याचेही व्हिडीओमध्ये दिसते.
ममता त्रिपाठी यांनी काल हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यांनी या व्हिडीओला ‘नवाबांचं शहर लखनऊ.. अलीगंजच्या शेजारी निराला नगर पुल.. जवानीची नशा आणि बुलेट.. हे कसलं प्रेम आहे ज्यासाठी लोक जीव धोक्यात घालायला तयार आहेत”, असे कॅप्शन दिले आहे. त्यांनी यूपी पोलीसांनाही ट्वीटमध्ये टॅग केले आहे. त्यांनी पोलीसांना देशाचे भविष्य सांभाळा असे आवाहन देखील केले आहे.
आणखी वाचा – Viral Video : बुरखा घालून गर्लफ्रेण्डला भेटायला गेला अन्… पुढे काय झालं, पाहा व्हिडीओ
फक्त ५ सेकंदाच्या या व्हिडीओला २७,००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. यूजर्स कमेंट करत व्हिडीओमधील तरुण-तरुणीवर टिका करत आहेत. एका यूजरने ‘रील बनवण्याचा आजार वाढल्याने लोक काहीही करत असतात’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या यूजरने ‘प्रेमापुढे पोलीस काहीच नाही’ अशी कमेंट केली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीसांनी त्या प्रेयसी आणि प्रियकरावर कारवाई केली आहे असे म्हटले जात आहे.