Viral video: स्वतःची नवीन गाडी विकत घ्यायची हे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी अनेक जण खूप मेहनतही घेतात. त्याशिवाय गाडी विकत घेतल्यानंतर ती खूप सांभाळून चालवतात. दरम्यान, अशाच एका नव्या गाडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यामध्ये त्या गाडीच्या मालकाने ती गाडी घरी आणताना त्या गाडीसोबत पार्किंगमधील इतर गाड्यांनाही ठोकलं. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, युजर्स गाडीमालकाची खिल्ली उडविताना दिसत आहेत.
गाडी घेतली खरी; पण चालवता येईना
या व्हायरल व्हिडीओच्या सुरुवातीला नवीन विकत घेतलेली चारचाकी गाडी बिल्डिंगच्या गेटवर येऊन पोहोचल्याचे दिसत आहे. पण, त्यानंतर गाडी हळूहळू पुढे जाताना अचानक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटते आणि गाडी स्पीडने पुढे जात पार्किंगमधील इतर गाड्यांवर जाऊन ठोकते. अशा रीतीने नव्या गाडीला पहिल्याच दिवशी अपघात होतो. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी यात गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे.
हेही वाचा : तू माझ्याशी लग्न करशील? पायलटने भर विमानात गुडघ्यावर बसून प्रेयसीला घातली लग्नाची मागणी
पाहा व्हिडीओ :
हा व्हिडीओ X (ट्विटर)वर @Professor of memes या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास तीन लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आणि हजारहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक जण यावर मजेशीर कमेंट्स करतानाही दिसत आहेत.
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय की, “ही गाडी बहुतेक पप्पांची परी चालवीत होती.” तर, दुसऱ्या एकाने लिहिलेय की, “गाडीचं जोरदार स्वागत झालं.” आणखी एकाने कमेंटमध्ये लिहिलेय की, “नव्या गाडीचं याहून अधिक चांगलं स्वागत होऊच शकत नाही.”