लग्नसमारंभ असला की घरात प्रत्येक कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी जोरदार तयारी सुरू असते. साखरपुडा, प्री वेडिंग, मेहेंदी, संगीत, हळद आणि मग लग्न असे अनेक कार्यक्रम लग्नघरात होतात. तर लग्न हा आयुष्यातला महत्त्वाचा दिवस कसा खास करता येईल याकडे नवरा-नवरीचं लक्ष असते. मग यासाठी मंडपात प्रवेश (एंट्री) करताना नवऱ्यासाठी डान्स, बाईकवरून हटके एंट्री करण्यात येते. पण, आज सोशल मीडियावर काही तरी अनोख पाहायला मिळालं आहे. लग्नात नवरा-नवरीच्या एंट्रीला दोन संस्कृतीची वाद्ये वाजवणाऱ्या वादकांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
या अनोख्या लग्न समारंभात नवरी पंजाबी, तर नवरा युरोपचा (Scottish) आहे; तर व्हायरल व्हिडीओत या जोडप्याची मंडपात एंट्री होते. नवरीने लाल लेहेंगा, तर नवऱ्याने काळ्या रंगाचा कोट परिधान केलेला असतो. यांच्या एंट्रीदरम्यान दोन वेगवेगळ्या प्रकारच्या वाद्यांनी त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. एकदा पाहाच हे पारंपरिक म्युझिकल मॅशअप…
व्हिडीओ नक्की बघा :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, लग्न मंडपात दोन संस्कृतींचं अनोखं सादरीकरण पाहायला मिळालं आहे. नवरा-नवरीचे स्वागत भारतीय आणि परदेशी या दोन्ही पद्धतीत करण्यात आलं आहे. नवरी मुलीकडून शेरवानी घालून ढोल-ताशा, तर नवऱ्या मुलाकडून सूट घालून विदेशातील काही वाद्यांचं उत्तम सादरीकरण केलं जात आहे, जे पाहून तुम्ही या लग्न सोहळ्याचं कौतुक कराल एवढं नक्की.
सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @insidehistory या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. दोन वेगवेगळ्या संस्कृतींचं सादरीकरण केलेलं पाहून नेटकरी विविध शब्दांत या व्हिडीओचं कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.