राज्यातील शेतीत सिंचन उपल्बध करून देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने शेततळे ही योजना काही वर्षांपूर्वी सुरू केली आहे. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका शेततळ्यात उतरण्यासाठी शेतकरी एक अनोखे वाहन तयार करतो आणि दुधीभोपळा काढताना दिसतो.

ओडिशामध्ये सुंदरगड जिल्ह्यातील तंगरपाली या गावात एका शेतकऱ्याने शेततळ्यावर दुधीभोपळ्याची शेती केलेली दिसते आहे. तसेच दुधीभोपळा काढून घेण्यासाठी शेतकऱ्याने अगदीच हटके युक्ती वापरलेली असते. शेतकरी चार छोटे-छोटे ड्रम आणि त्यावर एक स्टँड तसेच स्टँडवर पत्रा लावून घेतो. तसेच एक खास छोटे वाहन तयार करतो आणि त्यावर जाऊन बसतो. हे खास वाहन पाण्यात तरंगत असते आणि त्यावर बसून शेतकरी शेततळ्यावरील दुधीभोपळा एक-एक करून काढून घेताना दिसतो आहे. कशाप्रकारे शेतकऱ्याने जुगाड केला आहे, एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा.

The young woman hit under the donkey's ear
पाठलाग करणाऱ्या गाढवाबरोबर तरुणीनं केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
The unique friendship of a leopard and a deer
“अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क
tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
The young man holding paati wrote funny message
“सुंदर बायको भेटायला नशीब नाही, तर..” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO होतोय व्हायरल
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
Mom delivers baby by herself while riding in the car to the hospital Shocking video
चमत्कारावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; कारमध्ये महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या अन् पुढे जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही

हेही वाचा…तुम्हाला मोमोज खायला आवडतात का? फॅक्टरीमध्ये कसा तयार होतो तुमचा आवडता पदार्थ, पाहा VIRAL VIDEO

पोस्ट नक्की बघा :

शेततळ्यात केली दुधी भोपळ्याची लागवड :

व्हिडीओत शेतकरी अगदीच मजेत दुधीभोपळा अनोख्या स्टाईलमध्ये काढताना दिसत आहे. ओडिशाचे आयएएस अधिकारी (IAS) अरविंद पाधी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ओडिशामध्ये सुंदरगड जिल्ह्यातील तंगरपाली गावातील या शेततळ्यात भाजीपाल्यासह बांधाची शेती वाढवणे हे एक अदभूत दृश्य आहे. एनआरईजीएस (NREGS) आणि राज्य योजना (एकात्मिक शेती प्रणाली) अंतर्गत आमचे प्राथमिक उद्दिष्ट शेतकर्‍यांना जास्तीत जास्त नफा मिळवून देणे हे आहे.

सोशल मीडियावर ही पोस्ट अरविंद पाधी @arvindpadhee यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच ही पोस्ट पाहून अनेक जण शेतकऱ्याच्या युक्तीचे कौतुक करताना कमेंटमध्ये दिसले आहेत. अरविंद पाधी हे ओडिशा केरळचे आयएएस अधिकारी आहेत. तसेच त्यांनी ही पोस्ट शेअर करत शेतकऱ्याचे कॅप्शनमध्ये कौतुक केले आहे.