बँकेशिवाय आज काल कोणतेही आर्थिक व्यवहार होऊ शकत नाही. कोणत्याही व्यक्तीला बँकेत खाते असल्याशिवाय ऑनलाईन पेमेंट करता येत नाही. आज काल अनेक बँक सर्व बँकिंग सुविधा ऑनलाईन देतात पण काही काम बँकेत गेल्याशिवाय पूर्ण होत नाही. अजूनही असे लोक आहेत ज्यांना ऑनलाईन व्यवहार करता येत नाही ते बँकेत जाऊनच कोणताही व्यवहार करतात. पण अनेकदा बँक कर्मचारी ग्राहकांसह उद्दटपणे वागतात तर अनेकदा ग्राहक छोट्याशा कारणावरून वाद घालताना दिसते. सध्या अशाच एक घटनेच व्हिडिओ समोर आला आहे.
एका बँक कर्मचाऱ्याला ग्राहकाने मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मुदत ठेवीवर (फिक्स डिपॉझीट) टीडीएस कापल्यामुळे ग्राहक आणि बँक कर्मचारी आणि ग्राहकामध्ये वाद झाला. वादाचे रुपातंर भांडणात झाले. ही घटना गुजरातमधील अमहदामबाद येथे घडली आहे. व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गुजरात समाचारने वृत्तानुसार, शाखा व्यवस्थापक, सौरभ सिंह यांनी त्यांच्या तक्रारीत आरोप केला आहे की,’ ग्राहक ५ डिसेंबर रोजी त्यांच्या मुदत ठेवीच्या व्याजावरील TDS कपातीबद्दल विचारण्यासाठी बँकेत आला होता. परतावा प्रक्रियेबद्दल ( refund proces) सविस्तर स्पष्टीकरण मिळाल्यानंतरही, त्या व्यक्तीने कथितपणे संतप्त होऊन बँकेवर फसवणूक केल्याचा आरोप केला. व्हिडिओमध्ये इतर बँक कर्मचारी संतप्त ग्राहकाला मॅनेजरपासून दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
त्यानंतर त्याने सिंगचे ओळखपत्र काढले, त्याचा शर्ट हिसकावून घेतला आणि फाडला. दुसरा बँक कर्मचारी शुभम जैन याने हस्तक्षेप करून परिस्थिती निवळली तेव्हा रावलने त्याला चापट मारली आणि त्याचा शर्टही फाडला. ग्राहकाला शांत करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर बँक व्यवस्थापकाने पोलिसांना बोलावले. या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.