Cute Girl Stealing Puppies: श्वान हा अनेकांचा आवडता आणि खूप लाडका प्राणी आहे. श्वान खूप प्रामाणिक असल्यामुळे त्यावर सर्वांचा विश्वास असतो. या पाळीव प्राण्याला अनेकदा घरातील इतर सदस्यांपेक्षाही उत्तम वागणूक दिली जाते. त्याची आवड-निवड पूर्ण केली जाते. हल्ली अनेक जण श्वानाचे वाढदिवसदेखील आवडीने साजरे करताना दिसतात. अशा अनेक कौतुक सोहळ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. त्याशिवाय या लाडक्या प्राण्याचे घरातील अनेक मजेशीर किश्शांचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. आता असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही खूप हसू येईल.

लहान मुले खूप निरागस असतात, त्यामुळे ती मुले आणि घरातील पाळीव प्राणी यांच्यात नेहमीच अनोखे नाते पाहायला मिळते. ते नेहमी प्राण्यांची खूप काळजी घेतात, त्यांना खायला देतात, त्यांच्याबरोबर स्वतःचा खाऊ शेअर करतात. या प्राण्यांच्या हालचालींकडे लहान मुलांचे खूप बारकाईने लक्ष असते. मागील काही दिवसांपूर्वीही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात एक लहान मुलगा घरातील पाळीव श्वानाबरोबर सायकलवर बसून खेळताना दिसत होता. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी चक्क श्वानाचं पिल्लू चोरी करताना दिसतेय, जे पाहून तुम्हीदेखील कपाळावर हात मारून घ्याल.

Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दुध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
nagpur leopard latest news in marathi
Video : मादी बिबट्याने हरविलेले पिल्लू अलगद तोंडात धरून…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Mom Dress up the dog with a hat and sweater
थंडीपासून संरक्षणासाठी जबरदस्त जुगाड! श्वानाला कानटोपी, स्वेटर घालून केले तयार; पाहा मजेशीर VIDEO
mother shouts at the Pet Dog
आई अशीच ओरडते ना? घरभर केस पडलेले पाहून श्वानाला ओरडली अन्… ; VIDEO पाहून येईल हसू
Heartwarming video
“बापाला लेकीचं कौतुक जरा जास्तच असतं..” मुलीचे मोठ्या आवडीने फोटो काढत होते वडील, VIDEO होतोय व्हायरल
Video of Mothers Anger Over Sons Hair Growth
“डोक्यावर झिपऱ्या आहे.. ते काप..” मुलाची हेअर स्टाइल बघून आईला आला संताप, पाहा मजेशीर VIDEO

चिमुकलीने केली चोरी? (Cute Girl Stealing Puppies)

खरंतर चोरी करणं हा एक गुन्हा आहे, त्यामुळे चोरी करणारा व्यक्ती सापडल्यावर त्याला शिक्षादेखील दिली जाते. पण, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक लहान गोंडस मुलगी श्वानाच्या पिल्लाची चोरी करताना दिसतेय, जे पाहून तुम्हालाही हसू येईल. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगी झोपलेल्या श्वानाजवळ येते, तिथे तिच्या खेळण्यातील खोटा श्वान त्याच्याजवळ ठेवते आणि तिथे झोपलेल्या पिल्लांना स्वतःच्या हातात उचलून घेऊन पळत सुटते. दुसऱ्यांदा त्याच व्हिडीओमध्ये तीच चिमुकली आणखी एकदा पिल्लांची चोरी करताना दिसतेय, ज्यात तिच्या मागे श्वान लागल्याचे दिसत आहे.

हेही वाचा: भारत-पाकिस्तान सीमेवर हरणांचा एकमेकांवर हल्ला; भारतातील हरणाने पाकिस्तानच्या हरणाला दिली खुन्नस; BSF जवानाने शेअर केला VIDEO

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @nusta_jal या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्यावर युजर्स अनेक कमेंट्स आणि लाइक्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर आतापर्यंत जवळपास लाखो व्ह्यूज आणि तीस हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर एका युजरने लिहिलंय की, “मला माझं लहानपण आठवलं, मी पण असेच पिल्लू उचलून घरी घेऊन जायची.. आणि आईचा ओरडा खायची”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “आमच्या गावातपण असे चोर खूप आहेत.” आणखी एकाने लिहिलेय, “हा चोर खूप निरागस आहे.” तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “खूप गोड आहे मुलगी.”

Story img Loader