Viral Video: उन्हाळी सुट्टी म्हणजे शाळकरी विद्यार्थ्यांचा अगदीच जिव्हाळ्याचा विषय. या सुट्टीच्या दिवसांमध्ये पालक आणि मुलं यांच्यात एक नवं नातं निर्माण होते. पण, लहान मुलांबरोबर रोज नवीन कोणता खेळ खेळायचा असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. म्हणून काही पालक शिबीर, पर्यटन स्थळे, संगणकावरील विविध गेम, तर काही घरगुती खेळ खेळण्यात रमून जातात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका वडिलांनी त्यांच्या तीन मुलींसाठी घरच्या घरी खेळण्यातलं आईस्क्रीमचं दुकान उघडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वडिलांनी त्यांच्या तीन मुलींबरोबर खेळण्यासाठी घरी एक लहान आईस्क्रीम दुकान उघडलं आहे. डिजिटल क्रिएटर आणि तीन मुलांची आईने हा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. तिन्ही मुली पलंगावर उभ्या आहेत तर मुलींचे बाबा खिडकीबाहेर उभे आहेत ; जेणेकरून ते दुकानाच्या काउंटरसारखे दिसेल. पलंगावर उभ्या राहून तिन्ही मुली खिडकीकडे तोंड करून बाबांजवळ आईस्क्रीमची ऑर्डर देताना दिसत आहेत. एकदा पाहाच हा व्हिडीओ.

हेही वाचा…कर्करोगाशी लढण्याचं बळ देणाऱ्या ‘या’ तपासणी केंद्राचं आनंद महिंद्रानी केलं कौतुक; म्हणाले, ‘तुम्हाला सलाम…’

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, बाबा तिन्ही चिमुकल्यांच्या ऑर्डरप्रमाणे त्यांना खास कोन मधून आईस्क्रीम देताना दिसतात व चिमुकल्या सुद्धा बाबांनी दिलेलं आईस्क्रीम अगदीच आवडीने खाताना दिसून आल्या आहेत. हा सर्व मजेशीर खेळ आणि बाबा आणि चिमुकलीचा संवाद ऐकून तुम्हालाही नकळत तुमच्या बालपणीचे दिवस आठवतील एवढं नक्की.

सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @kaylievarney या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘माझ्या पतीने आमच्या मुलांसाठी आईस्क्रीमचे दुकान बनवले’; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून या अनोख्या खेळाबद्दल बाबांचे कौतुक करत आहेत. तर व्हिडीओतील मजेशीर गोष्टी कमेंटमध्ये सांगताना दिसून आले आहेत.