आयुष्यात एकदा आनंदाने जगायचं ठरवलं की मग वय, पैसा-अडका आणि इतर भौतिक सुखं या गोष्टी गौण ठरतात. अगदी उतारवयातही अनेक लोक जीवनाचा आनंद भरभरून लुटतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हीडिओत एक आजोबा एका विदेशी तरूणासोबत भर रस्त्यात गाण्यावर जबराट डान्स करताना दिसत आहेत. आजोबांचे वय झालेले असले तरी त्यांच्या मनातील तरूण पाहून सारेच जण थक्क होऊ लागले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झालाय. हा व्हिडीओ तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणेल.

या व्हिडीओत दिसणारे आजोबा साधारण 75-80 इतक्या वयाचे आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, रस्त्यावर एक विदेशी हॅंडसम तरूण बॉलिवूडमधलं सुपरहिट गाण्यावर डान्स करताना दिसतोय. त्याचा डान्स पाहण्यासाठी रस्त्यावर भलीमोठी गर्दी देखील जमा झालेली दिसतेय. बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री काजोल यांच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटातील ‘ओ ओ जाने जाना’ या गाण्यावर त्याच्या विदेशी स्टाईलमध्ये डान्स मूव्ह्स करताना दिसतोय. काही वेळाने तो बॉलिवूडच्या देसी डान्स स्टेप्स देखील करण्याचा प्रयत्न करतो. त्याला पाहण्यासाठी जमा झालेल्या गर्दीतून अचानक एक आजोबा एन्ट्री करतात आणि या विदेशी तरूणाच्या बरोबरीने गाण्यावर ठेका धरू लागतात.

Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
uncle aunty amazing dance on tauba tauba song
तौबा तौबा! काका काकूंनी केला जबरदस्त डान्स; Viral Video एकदा पाहाच
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Dance Viral Video
‘तुमसे जो देखते ही प्यार हुआ…’, गाण्यावर चिमुकलीने केला असा डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Video a brother cried for a bride sister on a wedding day
या दिवशी प्रत्येक भाऊ रडतो! बहिणीजवळ ढसा ढसा रडला; VIDEO पाहून व्हाल भावुक

या व्हायरल व्हिडीओमध्ये तरूणाचा विदेशी अंदाज विरूद्ध आजोबांचा देसी अंदाज अशी जुगलबंदी पहायला मिळाली. या वयातही आजोबांचा उत्साह इतका होता की व्हिडीओमधल्या तरूणाचा विदेशी अंदाज सुद्धा फिका पडला. एरवी सत्तरी ओलांडली की अनेकजण अंथरुणाला खिळतात. परंतु, डान्स करताना आजोबांच्या अंगात सळसळून उर्जा वाहताना दिसून येत आहे. आजोबांचा हा जबराट डान्स पाहून हा विदेशी तरूण सुद्धा त्या आजोबांच्या देसी डान्स स्टेप्स कॉपी करताना दिसून येतोय. या दोघांच्या डान्सची जुगलबंदी पाहण्यासाठी झालेले लोक केवळ बघतच राहिले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. आजोबांनी डान्सची आपलीच हटके, युनिक स्टाइल शोधून काढली आहे.

आणखी वाचा : हा VIRAL VIDEO पाहिल्यानंतर तुम्हाला मिळेल ‘अक्कल मोठी की म्हैस ?’ चं योग्य उत्तर

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा : रस्त्याच्या कडेला उभी होती मुलगी, अन् तरूणाने तिच्या हातात जे दिलं ते पाहून हैराण व्हाल! VIRAL VIDEO पाहाच

आजोबांचा हा सॉलिड डान्स नेटिझन्सनाही खूप आवडला आहे. सर्वांनी त्यांचं कौतुक केलं आहे. या वयातही आजोबांचा असा जोश पाहून सर्वांनी त्यांना दाद दिली आहे. या वयात शरीराच्या विशेषतः गुडघेदुखीची तक्रार असतेच असते. पण आजोबांनी असा डान्स केला आहे की गुडघेदुखीसुद्धा त्यांना घाबरून पळून जाईल. काही जणांनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पाकिस्तानचे मंत्री Fawad Chaudhry म्हणाले, Garlic म्हणजे आलं…; लोकांनी विचारलं, “कोणत्या शाळेत शिकले होते?”

हा व्हिडीओ ‘sudhirdandotiya’ नावाच्या एका ट्विटर युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. एका युजरने कमेंट करत लिहिलं की, “कीप इट अप दादू!” आणखी एका ट्विटर युजरने म्हटलं आहे की, “हे आमचे आजोबा आहेत.. भारतीय आजोबा”.

Story img Loader