Viral Video: समाजमाध्यमांवर कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनविण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे तेव्हापासून विविध भाषांतील विविध देशांतील नवनवीन गाणी सातत्याने व्हायरल होत आहेत. या् गाणयांवर लाखो लोक रील्स बनविल्या जात असल्याचे दिसते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गुलाबी साडी या मराठमोळ्या गाण्यानेही सोशल मीडियावर अनेकांना वेड लावले आहे. या गाण्यावर लाखो लोक रील्स बनवून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. फक्त सामान्य लोकच नाही, तर अनेक दिग्गज मराठी, बॉलीवूड कलाकार, तसेच परदेशांतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनीही या गाण्यावर रील्स तयार केल्या आहेत. अशातच आता या गाण्यावर डान्सचा नवा व्हिडीओ समोर आला आहे; जो पाहून प्रत्येक जण या डान्सचे कौतुक करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हायरल गाण्यावर आतापर्यंत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण डान्स करीत असल्याचे पाहायला मिळते. या गाण्यावर अनेक तरुणींनी गुलाबी साडी नेसून रील्स बनवल्या. त्याशिवाय नुकत्याच काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये एका लग्नामध्ये नवरदेवाच्या मित्रांनी गुलाबी ओढणी डोक्यावर घेऊन या गाण्यावर डान्स केला होता. पण आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील तरुणांनी या गाण्यासाठी हटके स्टाईल निवडली आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही तरुण साऊथ इंडियन लूकमध्ये डान्स करताना दिसत आहेत. सुरुवातीला त्यांच्याकडे पाहून ते साऊथ चित्रपटातील एखाद्या गाण्यावर डान्स करताना दिसतील, असं वाटलं. पण यावेळी अचानक गुलाबी साडी हे गाणं सुरू होतं आणि सगळे मिळून या गाण्यावर सुंदर डान्स करतात. डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा: किली पॉलचा मल्याळम ‘इल्युमिनाटी’ गाण्यावर हटके डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @the_panvelkars या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत एक दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि ९० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओला गुलाबी साडी साऊथ स्टाईल, अशी कॅप्शनही देण्यात आली आहे.

या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “तोडच नाय.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “एकदम कडक.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “खूप मस्त डान्स भावांनो.” आणखी एकानं कमेंटमध्ये लिहिलंय, “तुमचा डान्स लय भारी.”