Viral Video: समाजमाध्यमांवर नेहमी विविध विषयांवरील व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. यातील काही व्हिडीओ आपल्या मनाला आनंद देणारे तर काही व्हिडीओ आपल्या काळजाचा थरकाप उडवणारे असतात, ज्यातील अनेक व्हिडीओ क्षणार्धात लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळवतात. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमच्याही काळजाचं पाणी होईल.
असं म्हणतात, माणसाचा मृत्यू कोणाच्याच हातात नसतो. कोण कधी कोणत्या क्षणी आपला जीव गमावेल हे सांगता येत नाही. कधी अपघातात तर कधी हसता हसता अनेक जण आपला जीव गमावतात. तर अनेक जण दीर्घकाळ गंभीर आजाराने ग्रस्त असूनही अनेक वर्ष जगतात. यामागील सांगायचे तात्पर्य असे की, जीवन-मरण कोणाच्याही हातात नसते. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून तुम्हीही शॉक व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका आजोबांचा मृत्यू झाला म्हणून त्यांना स्मशानात नेण्यात आले आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रेताला अग्नि दिल्यानंतर आजोबा चक्क जिवंत झाले आणि अग्नि दिलेल्या लाकडांमधून बाहेर आले. मृत आजोबांना असं जिवंत झालेलं पाहून आसपास उभी असलेली सर्व मंडळी अवाक् झाली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @funcarryon या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत पाच मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून एक लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “बापरे खतरनाक” आणखी एकाने लिहिलेय, “अरे ते झोपले असतील.” आणखी एकाने लिहिलेय, “हे तर यमदेवाला भेटून परत पृथ्वीवर आला”