भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी पाहण्यासाठी परदेशातील अनेक पर्यटक इथे येतात. भारतातील विविध संस्कृती आणि त्याची माहिती जाणून घेण्याची त्यांना खूप इच्छा असते. अनेकदा ही परदेशातील मंडळी भारतातील संस्कृतीला आपलंस करून येथील पोशाख परिधान करून सणांमध्ये देखील आवर्जून सहभाग घेतात.
पण, कधी कधी परदेशी पर्यटकांना आपली भाषा समजत नाही. त्यामुळे त्यांना इंग्रजी भाषेत समजावून सांगावे लागते आणि त्या त्या ठिकाणची माहिती द्यावी लागते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. इथे एक सायकल-रिक्षा चालक परदेशी पर्यटकांना उत्तम इंग्रजी भाषेत विविध ठिकाणांची माहिती देताना दिसला आहे.
व्हायरल व्हिडीओ दिल्लीचा आहे. दिल्ली शहरात तीन चाकी सायकल-रिक्षा असतात ; ज्यात दोन ग्राहक बसू शकतात. तर व्हायरल व्हिडीओत सायकल-रिक्षामध्ये दोन परदेशी पर्यटक बसले आहेत. तसेच सायकल-रिक्षा चालक पर्यटकांना मार्गदर्शन करताना दिसत आहे. मार्गदर्शन करताना तो उत्तम इंग्रजी भाषेत माहिती देताना दिसतो आहे. एकदा पाहाच सायकल-रिक्षा चालकाचा हा व्हायरल व्हिडीओ.
हेही वाचा…आतापर्यंतची सगळ्यात भारी पुणेरी पाटी! वाचून तुम्हीही कराल कौतुक; VIDEO एकदा पाहाच
व्हिडीओ नक्की बघा :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, दोन्ही पर्यटक ब्रिटनमधून आलेले असतात. तर या पर्यटकांना हा सायकल-रिक्षा चालक दिल्लीतील प्रसिद्ध ठिकाणे आणि मोठ्या बाजारपेठेबद्दल इंग्रजी भाषेत सांगताना दिसत आहेत. तसेच दिल्ली या गजबजलेल्या शहरात त्यांना फोटो किंवा मार्केटमध्ये काही विकत घ्यायचे असल्यास नक्की कळवा असे सुद्धा पर्यटकांना आवर्जून सांगताना दिसत आहे.
सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @chandan_stp या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओला ‘भावाचे इंग्रजी ऐका आणि याला प्रसिद्ध करा’ ; असे कॅप्शन देण्यात आले आहे. सायकल-रिक्षा चालकाचे उत्तम इंग्रजी ऐकून अनेक नेटकरी थक्क झाले आहेत आणि विविध शब्दात त्याचे कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.