बाजारपेठेत एक फेरफटका मारला तर लक्षात येतं की जो हटके पद्धतीनं वस्तू विकण्याचा प्रयत्न करतो त्याच्याकडेच सर्व ग्राहक आकर्षित होत असतात. ट्रेनमध्ये येणारा एखादा विक्रेता असो किंवा रस्त्यावरचा फेरिवाला. त्याच्या ओरडण्याच्या हटके स्टाईलमुळेही आपण कुतुहलाने तो काय विकतोय हे पाहायला जात असतो. असे काही विक्रेते असतात ज्याच्या वस्तू विकण्याच्या स्टाईलमुळे आपल्याला खूप हसू येतं किंवा बऱ्याचदा आपल्याला काय रिअॅक्ट व्हावं हे सूचत नाही. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती ट्रॅफिक सिग्नलवर लेझर तलवारी विकत असल्याचं दिसत आहे. त्याची विकण्याची स्टाईलच इतकी भारी आहे की बस्स.

या व्यक्तीच्या विकण्याच्या अजब स्टाईलमुळे या व्हिडीओची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. पोटापाण्यासाठी लोक काय करतात? किती काय काय करावं लागतं तेव्हा कुठे जाऊन दोन वेळची भाकरी मिळते. आजच्या युगात बोलणाऱ्याची मातीही विकली जाते आणि न बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा विकलं जातं नाही असं आपण अनेकदा म्हणतो. जो आपल्या हटके स्टाईलने मार्केटिंग करू शकतो सध्याच्या युगात त्याचाच टिकाव लागू शकतो. अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आपल्या वस्तूचे चांगले मार्केटिंग करून लोकांना आकर्षित करण्याचे काम करत आहे. त्यांची ही कला पाहून लोकही हसतात.

आणखी वाचा : हत्तीण बाळाला जन्म देत होती, कळपाने असा साजरा केला क्षण, VIRAL VIDEO एकदा पाहाच!

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ दिल्लीतला आहे. दिल्लीतल्या ट्रॅफिक सिग्नलवर दिवस-रात्र उभं राहून हा व्यक्ती लेझरच्या तलवारी विकण्याचं काम करतो. आपल्या लेझरच्या तलवारी विकल्या जाव्यात यासाठी हा व्यक्ती काय शक्कल वापरतो, हे पाहून तुम्ही सुद्धा खळखळून हसाल. हा माणूस आपल्या रंगीबेरंगी लेझर तलवारी अनोख्या पद्धतीने रस्त्यावरच्या ग्राहकांना दाखवत आहे. ज्या लोकांना तो हे लेझरच्या तलवारी दाखवत आहे, ते त्याचे व्हिडीओ शूट करत आहेत आणि त्याच्याशी बोलत आहेत. बोलता बोलता तो आपल्या लेझरच्या तलवारींसोबत अभिनय देखील करताना दिसत आहे. तलवारींसोबत खेळत तो त्याच्या लेझरच्या तलवारी विकताना दिसत आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पाण्यामध्ये पोहणाऱ्या मगरीवर जग्वारचा हल्ला, नदीत उडी घेत मान जबड्यात धरून बाहेर काढलं

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : माणुसकी अजूनही जिवंत आहे! हा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

नेटिझन्स या व्हिडीओचे खूप कौतुक करत आहेत. या माणसाच्या आश्चर्यकारक मार्केटींग स्टाईलबद्दल चर्चा करताना दिसत आहेत. इन्स्टाग्राम यूजर वरुण शर्माने त्याच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर तो बघता बघता सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरू लागला. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की आतापर्यंत या व्हिडीओला ८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ९० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक त्याच्या स्टाईलवर खूपच फिदा झाले असून त्याच्याबद्दल विचारणा करणाऱ्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिसत आहे.

Story img Loader