Viral Video: भारतात देसी जुगाड करणाऱ्या व्यक्तींची कमी नाही. अशा लोकांच्या देशी जुगाडचे हटके व्हिडीओ समाजमाध्यमांवर अनेकदा व्हायरल होत असतात. त्यात कधी कोण गाडीमध्ये एसी लावताना दिसतो; तर कधी कोण जुन्या कपड्यांचा हटके पद्धतीने वापर करताना दिसतो. अशा मजेशीर व्हिडीओला लोक मोठ्या प्रमाणात पसंतीदेखील देताना दिसतात. आता अशाच आणखी एका देसी जुगाडचा व्हिडीओ समोर आला आहे; ज्यात तो असे काहीतरी करतोय, जे पाहून तुम्हालाही हसू येईल.

समाजमाध्यमांवर फॉलोअर्स वाढवून प्रसिद्धी मिळविण्यासाठी लोक कधी काय करतील हे सांगता येत नाही. त्यासाठी अनेकदा विचित्र व्हिडीओदेखील ते तयार करत असतात. पण, बऱ्याचदा अशा व्हिडीओंमुळे अनेकांचे मनोरंजन होते. एका हुशार व्यक्तीने असाच एक अनोखा देसी जुगाड केला आहे; जो पाहून तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल.

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”
‘या’ अभिनेत्याची एक चूक मनोज बाजपेयी यांच्या जीवावर बेतली असती; स्वतः खुलासा करत म्हणाले, “आमची जीप एका मोठ्या…”
shocking video viral
क्षणभराची मस्ती बेतली जीवावर! कोलांट उड्या मारताना तरुणाबरोबर नेमकं काय घडलं? पाहा, धक्कादायक VIDEO
Do you call your husband Aho
तुम्ही नवऱ्याला ‘अहो’ म्हणता का? आजच थांबवा, तरुणीने सांगितले जपानी भाषेत ‘अहो’ ला काय म्हणतात; पाहा Viral Video
What Sunil Tatkare Said About Chhagan Bhujbal ?
Sunil Tatkare : “छगन भुजबळ यांच्याविषयी येवल्यात जाऊन कोण काय बोललं होतं ते…”; सुनील तटकरेंचं सुप्रिया सुळेंना उत्तर

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @deepakjaiswal9902 या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका गृहस्थाने त्याच्या स्वयंपाकघरात शर्ट इस्त्री करण्यासाठी ठेवला आहे. पण, शर्ट इस्त्री करण्यासाठी तो कोणत्याही इस्त्रीचा वापर न करता, चक्क गॅसवर ठेवलेल्या कुकरचा वापर करतो. त्याचा हा देसी जुगाड पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहे. शिवाय अनेक जण त्याच्या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

हेही वाचा: किती मोठं धाडस! सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी अ‍ॅनाकोंडासोबत केलं शूट; अन् पुढे घडलं असं काही… थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा

पाहा व्हिडीओ:

या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत ६.६ मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून, ७० हजारहून अधिक लाइक्सदेखील मिळाल्या आहेत. त्यावर एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “गॅस तर बंद कर भावा.” तर, दुसऱ्याने लिहिलेय, “चांगली आयडिया आहे हीपण.” तिसऱ्या एका व्यक्तीने लिहिलेय, “हे टॅलेंट भारताबाहेर जाऊ देऊ नका.” तर, आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “व्हिडीओ बनविण्यासाठी लोक काय काय करतात.”

दरम्यान, याआधीदेखील असेच देसी जुगाडचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यापैकी एकामध्ये एका व्यक्तीने म्हशीला उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून चक्क गोठ्यात एसी लावला होता. तर, आणखी एकाने उन्हाळ्यात रिक्षा तापते म्हणून रिक्षाच्या छताला गोणीने पूर्णपणे झाकले होते.

Story img Loader