Viral Video: प्राणी असो किंवा माणूस दोघांची आयुष्य जगण्याची पद्धत जरी वेगळी असली तरीही या दोन्ही सजीवांमध्ये पोट भरणे ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, त्यासाठी ते आपापल्या परीने प्रयत्न करताना दिसतात. आजवर तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील, ज्यामध्ये हिंस्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसले असतील. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही अशीच एक घटना मानवी वस्तीमध्ये घडल्याचे दिसत आहे.
मोबाइल हे एक असं साधन आहे, जे हातात येताच अनेकांना कशाचेच भान राहत नाही. कधी रस्त्यावरून चालताना तर कधी गाडी चालवतानाही लोक मोबाइल बाजूला ठेवत नाहीत, यामुळे अनेकदा अपघातही होतात. आता समोर आलेल्या व्हिडीओतही असाच एक प्रकार पाहायला मिळत आहे, ज्यात रात्रीच्या वेळी मोबाइल घेऊन घराबाहेर बसलेल्या तरुणाच्या बाजूला बिबट्या आल्याचेही त्याला कळत नाही.
वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी अनेकदा मानवी वस्त्यांमध्ये शिरकाव करून तेथील माणसे किंवा श्वान, शेळी अशा प्राण्यांवर हल्ला करतात. शिकार करण्यासाठी ते रात्रीची वेळ निवडतात. आता व्हायरल व्हिडीओतही एका बिबट्याने अशीच युक्ती आखून शिकार केल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रात्रीच्या वेळी घराबाहेर एक तरुण हातामध्ये मोबाइल घेऊन रील्स पाहण्यात व्यस्त आहे, यावेळी तो झोपलेल्या पलंगाच्या बाजूला एक श्वानही झोपलेला दिसत आहे. त्यावेळी एक बिबट्या तिथे येतो आणि हळूहळू श्वानाच्या दिशेने येऊन अचानक त्याला आपल्या जबड्यात पकडून घेऊन जातो. यावेळी मोबाइलमध्ये व्यस्त असलेला तरुण भानावर येतो आणि घरात पळून जातो. श्वानाचे नशीब चांगले म्हणून तो बिबट्याच्या तावडीतून सुखरूप सुटतो आणि आपल्या घराकडे पळत येतो. त्या तरुणाने श्वानाला घरात घेतले नाही, त्यामुळे अनेक जण त्याला ट्रोल करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @shreshthamaharashtra या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास लाखो व्ह्युज आणि अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. नेटकरीदेखील त्यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.
एका युजरने लिहिलेय, “श्वानाला बाहेरच सोडून घरात पळून गेला.” दुसऱ्याने लिहिलेय, “शेतात घर बांधून राहताच का?” तिसऱ्या एकाने लिहिलेय, “त्या बिचाऱ्या श्वानाला बाहेर ठेऊन घरात गेला, त्याला घरात घेऊ शकत होता पण घेतलं नाही,” आणखी एकाने लिहिलेय, “तरी बरं मोबाइलवर खेळत होता.. नाही तर ह्याचाच खेळ झाला असता.”