Viral Video: मागील काही दिवसात लिफ्टमध्ये कुत्रा चावण्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आपल्या पाळीव कुत्र्यांची काळजी घेण्यात त्यांच्या मालकांकडून बेजबाबदारीने वागण्याचे हे परिणाम इतर निर्दोष व्यक्तींना भोगावे लागत आहेत. असा एक प्रकार आता गाझियाबाद, नोएडा पाठोपाठ पनवेलमध्येही घडल्याचे समजत आहे. पनवेलच्या इंडियाबुल्स ग्रीन्स मेरीगोल्ड सोसायटीमध्ये अन्न डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या गुप्तांगाला सोसायटीतील एका पाळीव जर्मन शेफर्डने चावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतोय.
प्राप्त माहितीनुसार, या ३३ वर्षीय डिलिव्हरी कर्मचाऱ्याचे नाव नरेंद्र पेरियार असून तो इमारतीत दुपारच्या वेळेस एक अन्न पोहचवण्यासाठी गेला होता. डिलिव्हरी करून लिफ्टमधून खाली येताच दारातच त्याला एक तरुण आपल्या जर्मन शेफर्डसह दिसला. सुरुवातीला त्या कुत्र्याला पाहूनच या डिलिव्हरी बॉयला थोडी भीती वाटली पण कुत्र्याच्या मालकाने त्याला बाजूने जाण्यास सांगितल्यावर तो निघाला. खरंतर यावेळी कुत्र्याच्या मालकाने त्याला धरले होते मात्र तरीही कुत्र्याने पुढे जाऊन डिलिव्हरी कर्मचाऱ्याच्या गुप्तांगावर अक्षरशः रक्तबंबाळ होईपर्यंत हल्ला केला.
पहा व्हायरल व्हिडीओ
अर्थात या हल्ल्यामुळे हादरून गेलेला नरेंद्र थेट पार्किंगच्या दिशेने पळत सुटला. यानंतर नेरूळच्या डीवाय पाटील हॉस्पिटलमध्ये त्याला उपचारासाठी नेण्यात आले. या प्रकरणानंतर कुत्र्याच्या मालकावर कोणताही दंड आकारलेला नाही पण त्याने नरेंद्रच्या उपचारांच्या खर्च करण्याचे आश्वासन दिले.
Video: जंगलाचा नवा राजा झेब्रा होणार का? बलाढ्य सिंह अक्षरशः रडकुंडीला आला, पाहा थरार
नरेंद्र पेरियारने या दिवशीचा आणखी एक योगायोग सांगत म्हंटले की, “या दिवशी माझ्या घरच्यांनी मी कामावर जाऊ नये म्हणून आग्रह केला होता पण मी तरीही कामासाठी बाहेर आलो आणि हे सर्व घडलं. प्रत्येक सोसायटीने इमारतीतील पाळीव कुत्र्यांच्या मालकांना काही नियम आखून देणे गरजेचे आहे अन्यथा इतरांना नाहक त्रास होऊ शकतो. “