Viral Video: समाजमाध्यमांवर सतत विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये बऱ्याचदा प्राण्यांचे व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात आपण पाहतो. या व्हिडीओंमधील काही हिंस्त्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात; तर कधी प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात लाखो व्ह्युज मिळवतात. दरम्यान, आता दोन श्वानांचा असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे, ज्यात ते असं काहीतरी करत आहेत, जे पाहून नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत.
माणसांप्रमाणेच प्राणीदेखील विविध गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतात. आपण जसे खेळतो, तसेच प्राणीदेखील एकमेकांसोबत खेळताना दिसतात. सोशल मीडियावर प्राण्यांचे असे गमतीशीर व्हिडीओ खूप व्हायरल होतात. मागील काही महिन्यांपूर्वी असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यात श्वान घरातील सदस्यांबरोबर खेळताना दिसले होते; तर कधी घरातील मुख्य सदस्याला घाबरून रूसलेले दिसले होते. दरम्यान, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन श्वान चक्क बेली डान्स करताना दिसत आहेत.
खरं तर श्वान हा अनेकांचा आवडता प्राणी आहे, त्यामुळे घरात श्वानाला इतर सदस्यांप्रमाणेच वागणूक दिली जाते. आवडीचा खाऊ दिला जातो, फिरायला नेलं जातं. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील दोनपैकी एका श्वानाच्या कंबरेला बेली डान्स करताना लावला जाणारा स्कार्फ लावण्यात आला असून यावेळी तो बेली डान्स करताना दिसत आहे. या श्वानाचा डान्स पाहून बाजूला उभा असलेला दुसरा श्वानही डान्स करत आहे. या व्हिडीओतील श्वानांचा हा बेली डान्स सध्या खूप चर्चेत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @pankaj_music_uk15 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत सात मिलियनहून अधिक व्ह्युज आणि दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.
हेही वाचा: ‘पुष्पा २’ मधील ‘थप्पड मारूंगी’ गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
पाहा व्हिडीओ:
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “काळ्या श्वानालाही एक कंबरपट्टी द्यायला हवी होती.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “खूपच सुंदर.” तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “हे मालकिणीने शिकवलं असणार.”
दरम्यान, यापूर्वीदेखील काही श्वानांचे अनेक गमतीशीर व्हिडीओ खूप व्हायरल झाले होते, ज्यातील एका व्हिडीओमध्ये श्वान मालकाच्या वरातीमध्ये नाचताना दिसला होता, तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये श्वान गल्लीतल्या चिमुकल्याबरोबर नाचताना दिसला होता.