पाळीव प्राणी अनेकांच्या घरातील केंद्रबिंदू असतात. घरातील प्रत्येक सदस्य त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत असतो, इतकेच नाही तर ते पाळीव प्राणीदेखील घरातल्या प्रत्येक सदस्याला तितकाच जीव लावतात, घरातल्या सदस्यांवर एखादे संकट ओढावले तर ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदतीसाठी धाव घेतात, असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. जर आपल्या मालकाने इतर प्राण्याचे लाड करायला सुरूवात केली तर हे प्राणी काय प्रतिक्रिया देतात हे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एका घराच्या सोफ्यावर एक व्यक्ती आणि त्याचा पाळीव कुत्रा बसलेला दिसत आहे. त्यांच्याशेजारी आणखी एक कुत्रा उभा आहे. उभ्या असलेल्या कुत्र्याचे मालक लाड करत असल्याचे पाहून शेजारी बसलेला कुत्रा चिडतो. तो मालकाच्या पाठीवर हात ठेवत त्याला अडवण्याचा देखील प्रयत्न करतो. पण मालक तरीही त्याचे लाड करत असल्याचे पाहून तो रुसून सोफ्यावर झोपून तो रागवला असल्याचे दाखवतो. पाहा या कुत्र्याची गोंडस प्रतिक्रिया.
आणखी वाचा: दारू पिऊन मुंबईकर तरुणीने बंगळूरमधून बिर्याणी केली ऑर्डर; झोमॅटोचं बिल पाहून तुम्हीही थक्क व्हाल
व्हायरल व्हिडीओ:
कुत्र्याच्या या गोंडस प्रतिक्रियेने नेटकऱ्यांची मनं जिंकली असुन, या व्हिडीओला १९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. प्राणीदेखील हक्काने रुसतात, त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही तर लगेच रागवतात हे या व्हिडीओतून दिसून येत आहे.