सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल आणि लोकांना आवडेल सांगता येत नाही. कधी लोकांचं लक्ष वेधून घेणारे, तर कधी लोकांचं लोकांची दाद मिळवणारे. अशा बऱ्याच घटना सोशल मीडियातून लोकांना भावतात. तेरी मेहरबानियां सिनेमाची आठवण यावी, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कुत्रा हा प्रामाणिक प्राणी असल्याचे अनेक किस्से ऐकतच असतो. पण, त्याला दुजोरा देणारी एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना चीनमधील असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. एक व्यक्ती विहिरीत बूडत आहे. बुडताना ती व्यक्ती त्याच्या कुत्र्याला मदतीसाठी आवाज देतो.

मालकाचा आवाज ऐकून कुत्राही आवाजाच्या दिशेने धावत येतो. विहिरीजवळ आल्यानंतर कुत्रा मालकाचा शोध घेतो. त्यानंतर मात्र, थेट धावत जाऊन पाण्यात उडी घेतो. त्यानंतर मालकाचा हात पकडून पाण्याबाहेर काढतो. हा व्हिडीओ ट्विटर आणि फेसबुकवर व्हायरल होत आहे.