Viral Video Today: अरे काय कुत्र्या मांजरांसारखं भांडताय? हा प्रश्न कधी ना कधी आपणही ऐकला असेलच ना. अर्थात कुत्रा आणि मांजर हे एकमेकांचे कट्टर शत्रू मानले जातात, मांजर समोर दिसताच झडप घालायला धावणारे कुत्रे आणि जीवाला घाबरूनही गुरगुरणाऱ्या मांजरी हे दृश्य अनेकदा गल्लीबोळात पाहायला मिळते. इतकंच काय तर सोशल मीडियावरही अनेकदा कुत्रा व मांजरीच्या भांडणाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, पण यावेळेस संमोर आलेला व्हिडीओ थोडा हटके आहे. यामध्ये चक्क एका कुत्र्याने मांजरीचा जीव वाचवल्याचे दिसत आहे. आपल्या शत्रूला मदत करण्याचा कुत्र्याचा चांगुलपणा सर्वांना थक्क करत आहेच पण त्यापेक्षाही मांजरीला वाचवण्यासाठी कुत्र्याने जी शक्कल लढवली ती अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
ट्विटर वर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला सोशल मीडियावर सुंदर प्रतिक्रिया मिळत आहेत, अनेकांनी या कुत्र्याच्या बुद्धीचे व मनाचे कौतुक केले आहे. खरंतर झालं असं होतं की, एका जंगलात वाहणाऱ्या ओढ्यात एक मांजर दगडावर अडकलं होतं. मांजराला दगडापासून ते ओढ्याच्या काठापर्यंत येण्यासाठी मार्गच नव्हता. इतक्यात हा कुत्रा तिथे एखाद्या देवदूतासारखाच आला. त्याने मांजराला पाहिलं अन पळत जाऊन एक लाकडी फळी घेऊन आला. कुत्र्याने फळी आणून मांजर व ओढ्याचा काठ यात एक पूल तयार केला, फळीवर चढून मांजराने सहज हा पूल पार केला आणि स्वतःचा जीव वाचवला.
अन त्या कुत्र्याने वाचवला मांजरीचा जीव
Video: लगट करणं पडलं महाग! महिलेचा डान्स बघून बेभान तरुण स्टेजवर चढला; तिने कंबरेवर उचललं अन पार…
कुत्र्याच्या या एवढ्याश्या हुशारीने मांजराचा जीव वाचण्यास मदत झाली हे पाहून नेटकरी आनंदीच नव्हे तर भावुकही झाले आहेत. अशी मदत जर आपण माणसंही एकमेकांना करू लागलो तर जग किती सुंदर होईल अशा पद्धतीच्या कमेंट या व्हिडीओखली दिसून येत आहेत. व्हिडीओ शेअर केल्यापासून अवघ्या २४ तासातच या व्हिडिओला २ मिलियन म्हणजेच तब्बल २० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला व आता आपणही या मुक्या प्राण्यांकडून काय शिकवण घ्याल हे कमेंट करून नक्की कळवा.