आपल्यातील अनेक जण श्वानप्रेमी आहेत. श्वान हा सर्वात इमानदार प्राणी मानला जातो. कामावरून मालक घरी परतल्यावर त्याच्याकडे उत्साहाने धाव घेतो, तुमच्याशी येऊन मनसोक्त खेळतो, तुमच्या सतत मागे-मागे फिरताना दिसतो. एकूणच पाळीव असो किंवा भटका श्वान हे प्राणी माणसांवर खूप प्रेम करतात आणि त्यांच्याशी नेहमी निष्ठावान राहतात, तर आज सोशल मीडियावर याचे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळालं आहे. व्हायरल व्हिडीओत घराबाहेर उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरला जोडलेली वायर (कॉर्डला) पेट घेते आणि श्वान या प्रसंगावर एकटा मात करताना दिसतो.
व्हायरल व्हिडीओ सीसीटीव्ही फूटेजचा आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या या घटनेत श्वान घराबाहेर खाटेवर बसलेला दिसतो आहे. तेव्हा अचानक दारात उभ्या असणाऱ्या घरमालकाच्या इलेक्ट्रिक स्कूटरला जोडलेल्या एक्स्टेंशन कॉर्ड पेट घेते आहे असे दिसून येत आहे. हे पाहताच श्वान इकडे तिकडे पाहतो. आजूबाजूला घरातील कोणताही सदस्य उपस्थित नसल्यामुळे श्वान एकटाच या परिस्थितीचा सामना करतो. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ.
हेही वाचा…लग्न मंडपात नवरा-नवरीची एंट्री अन् दोन वाद्य संस्कृतीचा अनोखा मिलाफ; पाहा VIDEO
व्हिडीओ नक्की बघा :
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक्स्टेंशन बोर्डला जोडलेला प्लग श्वान तोंडाने खेचू लागतो. अनेकदा प्रयत्न केल्यानंतर श्वान प्लग डिस्कनेक्ट करण्यात यशस्वी होतो आणि ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांवर येणारी आपत्कालीन परिस्थितीचा श्वानाने मोठ्या हुशारीने सामना केला आहे. प्लग डिस्कनेक्ट केल्यानंतर श्वान पुन्हा खाटेवर जाऊन बसतो. हा सर्व प्रकार घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता श्वानाने हे मोठं धाडस करून दाखवलं आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @buitengebieden या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण, हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही नवल वाटेल एवढं नक्कीच. तर नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून श्वानाच्या धाडसाचे विविध शब्दात कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.