Viral Video: प्राणीदेखील माणसांप्रमाणेच विविध गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतात. आपण जसे खेळतो, तसेच प्राणीदेखील एकमेकांसोबत खेळताना दिसतात. सोशल मीडियावर प्राण्यांचे असे गमतीशीर व्हिडीओ खूप व्हायरल होतात. दरम्यान, आतादेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक श्वान चक्क एका अशा ठिकाणी पोहोचलाय ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर सतत अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. त्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. या व्हिडीओंमध्ये कधी काही हिंस्त्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात; तर कधी प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात लाखो व्ह्यूज मिळवतात. अशातच आता एका श्वानाचा एक मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही कपाळावर हात मारून घ्याल.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका सिंगिंग कॉन्सर्टमध्ये अचानक एक श्वान स्टेजवर पोहोचतो आणि संपूर्ण स्टेजवर पळत सुटतो. गाणी ऐकण्यासाठी आलेले प्रेक्षक श्वानाला स्टेजवर पाहून अवाक् होतात आणि मोठमोठ्याने हसू लागतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा: ‘याला बोलतात संस्कार…’ चिमुकल्याने तुळशीचं लग्न लावताना गायली मंगलाष्टके; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @rajkumar.sharma.9638 वरून करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास तीन मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि अडीच लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर एका युजरने लिहिलंय की, “माझ्या मित्राचा परफॉर्मन्स कसा वाटला.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “मजा आली हे पाहून.” तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “स्वॅग आहे त्याचा”, तर इतर अनेक जण या व्हिडीओवर हसताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video dog took to the stage at the music concert netizens were shocked after seeing the video sap