Viral Video : कुत्रा हा माणसाच्या अतिशय जवळचा प्राणी आहे. कुत्र्याचा उल्लेख माणसाचा मित्र म्हणून केला जातो. कुत्रा हा त्याच्या प्रामाणिकपणा साठी ओळखला जातो. या प्रामाणिकपणामुळे त्याने माणसाचे मन जिंकले आहे. आज असंख्य लोक कुत्रा पाळतात आणि कुत्र्याला घरच्या सदस्यांप्रमाणे वागवतात. पाळीव कुत्रा मालकाची काळजी करतो, संरक्षण करतो आणि छोट्या मोठ्या कामात मदत करतो. अनेकदा कुत्रा मालकाविषयी भावुक झालेला दिसून येतो. सोशल मीडियावर तर कुत्र्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.
सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की कुत्र्याने असे काही केले आहे की तुम्हाला विश्वास बसणार नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (viral video Dog tore 500 rupees notes video goes viral on social media)
कुत्र्याने ५०० च्या नोटांचे केले तुकडे
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला जमीनीवर कागदाचे तुकडे आणि पाचशेच्या नोटांचे तुकडे पडलेलेल दिसेल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती हे तुकडे उचलताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की पाचशेच्या नोटांचे तुकडे कोणी केले असेल? काही लोकांना लहान मुलांनी हे तुकडे केले असेल, असे वाटू शकते पण कॅमेऱ्यात पुढे कुत्र्याला दाखवले जाते जो शांत एका ठिकाणी उभा आहे म्हणजेच कुत्र्याने या पाचशे रुपयांचे तुकडे केले आहेत.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
annie_pupstar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भावा ते मुके प्राणी आहेत, त्यांना पैशांची पर्वा नाही, ते प्रेमाचे भुकेले आहेत” तर एका युजरने लिहिलेय, “भोला भाला था सीधा-साधा था मैं तो नादान था.. दुनियादारी से होशियारी से मैं तो अनजान था” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझा कुत्रा सुद्धा असाच आहे” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.