Viral Video: श्वान आणि मांजर हे पाळीव प्राणी अनेक जण पाळतात. लोक त्यांच्या या पाळीव प्राण्यांवर खूप प्रेम करतात, त्यांची व्यवस्थित काळजी घेतात. या पाळीव प्राण्यांना अनेकदा घरातील इतर सदस्यांपेक्षाही उत्तम वागणूक दिली जाते. त्यांची आवड-निवड पूर्ण केली जाते. अलीकडे या प्राण्यांचे वाढदिवसदेखील आवडीने साजरे केले जातात. अशा अनेक कौतुक सोहळ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात; त्याशिवाय या लाडक्या प्राण्यांचे त्यांच्या घरातील अनेक मजेशीर व्हिडीओदेखील समाजमाध्यमांवर खूप व्हायरल होत असतात. आता असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; जो पाहून तुम्हीही शॉक व्हाल.
श्वानांना प्रामाणिक प्राणी म्हणून ओळखलं जातं. माणसांप्रमाणे तेदेखील खूप हुशार आणि समजूतदार असतात. आतापर्यंत आपण श्वानांचे असे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत; ज्यात कधी श्वान आपल्या मालकाचा जीव वाचविताना दिसतो; तर कधी मालकाची मदत करताना दिसतो. दरम्यान, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील श्वान चक्क वडापाव विकताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील आश्चर्यचकित व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, श्वान एका स्टॉलवर बसला असून, तो वडापाव विकताना दिसतोय. यावेळी तो मिरच्यादेखील स्वतःच्या हाताने तळतो आणि वडापाव सर्व्ह करताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल आणि आश्चर्य वाटेल. दरम्यान, हा व्हिडीओ केवळ मनोरंजन म्हणून बनविण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हायरल व्हिडीओ @oscarnkarma या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत एक दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि ९० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.
या व्हिडीओवर एकाने कमेंटमध्ये लिहिलेय, “हा वडापाववाला वडापाववालीपेक्षा चांगला आहे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “एक प्लेट माझ्यासाठीपण तयार कर.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “व्वा किती सुंदर.” आणखी एकाने लिहिलेय, “तू माझं मन जिंकलंस.”
दरम्यान, यापूर्वीदेखील सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यात एक श्वान चिकन पाहिल्यावर डान्स करताना दिसला होता. आणखी एका व्हिडीओमध्ये श्वान त्याच्या मालकिणीला फसवून पावसात भिजण्यासाठी गेला होता.