Viral Video: आपण सोशल मीडियावर विविध विषयांवरील आधारित व्हिडीओ पाहतो. ज्यातील काही व्हिडीओंमध्ये अनेक गमतीशीर गोष्टी असतात, ज्यामुळे आपले मनोरंजन होते; तर काही व्हिडीओंमध्ये थरकाप उडवणारे किंवा मनाला स्पर्श करणाऱ्या घटना पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यात एका प्राण्याबद्दल असंवेदनशीलता पाहायला मिळत आहे, जे पाहून तुम्हालाही वाईट वाटेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शालेय शिक्षण घेत असताना आपल्याला प्रत्येक प्राण्याची त्याच्या स्वभावानुसार ओळख करून दिली जाते. वाघ, सिंह यांसारख्या काही प्राण्यांना हिंस्र प्राणी म्हणून ओळखलं जातं, तर गाढवाला आळशी प्राणी तर घोड्याला चपळ प्राणी म्हटलं जातं. या दोन्ही प्राण्यांचा वापर अनेक ठिकाणी ओझी वाहून नेण्यासाठीही केला जातो. पण, कधी कधी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी त्या प्राण्यांचा खूप चुकीच्या पद्धतीने वापरही करतात. आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्येही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

हा व्हायरल व्हिडीओ उत्तराखंड येथील असून यावेळी बर्फाळ परिसरातून गाढवावर बसून काही पर्यटक प्रवास करताना दिसत आहेत. पण, यावेळी अचानक गाढवाला वजन झेपत नसल्यामुळे तो पर्यटकासकट खाली पडतो आणि घसरत घसरत खाली जाऊन सरळ खालच्या दरीत कोसळतो. लोक स्वतःच्या स्वार्थ्यासाठी मुक्या जनावरांचा कसाही वापर करतात. हा व्हिडीओ पाहून अनेक जण हळहळ व्यक्त करत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @comm.entadda या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत जवळपास सव्वीस मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर दीड मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने, “जर तुम्ही चालू शकत नाही, मग फिरायला जाऊ नका”, असा संदेश पर्यटकांसाठी लिहिला आहे. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.

हेही वाचा: ‘गुलाबी साडी’, गाण्यावर परदेशी चिमुकलीचा भन्नाट डान्स; एक्स्प्रेशन्स आणि डान्स स्टेप्स पाहून नेटकरी करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘हे पाहून मला खूप वाईट वाटलं’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘या गोष्टीवर बंदी घालायला हवी’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘माणसांना लाज वाटायला हवी.’