Viral Video: अलीकडच्या काळात लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. अनेकांचे लक्ष सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंकडे असते. असे विविध प्रकारचे व्हिडीओ पाहून लोक स्वतःचे मनोरंजन करून घेतात. यात अनेक प्राण्यांचेदेखील मजेशीर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आपण पाहतो. नुकताच असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून अनेक जण पोट धरून हसत आहेत.
माणसं नाटकी असतात हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. पण, अनेकदा माणसांप्रमाणे काही प्राणीदेखील खूप नाटकी असतात. ज्यांच्या घरी पाळीव प्राणी असतात त्यांना ही गोष्ट नक्कीच ठाऊक असेल. सध्या सोशल मीडियावर असाच एक गमतीशीर व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक भटका कुत्रा असं काहीतरी करतोय जे पाहून तुम्हालाही हसू येईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक भटका कुत्रा रस्त्यावरून चालताना मागचे दोन पाय वाकडे करून चालत आहे. त्या कुत्र्याचे चालणे पाहून त्याच्या मागच्या पायाला काहीतरी दुखापत झाली असावी असा अनेकांचा समज होतो. बराचवेळ तो कुत्रा रस्त्यावर त्याच स्थितीत चालत होता. त्याच्या अशा चालण्याने रस्त्यावरील गाड्याही थांबल्या; शिवाय त्यामुळे ट्रॅफिक जाम झालं. तेवढ्यात एक व्यक्ती कुत्र्याची मदत करण्यासाठी धावला. पण, ती व्यक्ती आपल्या जवळ आलेला पाहून कुत्रा चटकन चार पायांवर नीट उभा राहिला आणि चालत चालत दुसरीकडे निघून गेला. कुत्र्याची ही ॲक्टिंग पाहून रस्त्यावरील प्रत्येक जण आश्चर्यचकित झाले.
पाहा व्हिडीओ:
हा व्हायरल व्हिडीओ x(ट्विटर) वरील @ThebestFigen या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत तीन मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर तीन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक जण कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत. त्यातील एकाने लिहिलंय की, “याला एक ट्रॉफी मिळायलाच हवी.” तर दुसऱ्या एकाने लिहिलंय की, “याला कोणीतरी चित्रपटात घ्या”, तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “मला वाटतंय तो व्यायाम करत होता”, तर आणखी एकाने गमतीत लिहिलंय की, “हे तो माणसांकडूनच शिकला आहे.”
दरम्यान, यापूर्वीचेदेखील काही कुत्र्यांचे असेच मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाले होते. ज्यात एक कुत्रा पावसात भिजण्यासाठी त्याने मालकिणीला चकवा दिला होता, तर आणखी एक कुत्रा चिकनचा पीस पाहून डान्स करताना दिसत होता.