Viral Video: जेव्हापासून सोशल मीडियावर रील्स बनविण्याचा ट्रेंड सुरू झाला तेव्हापासून लोक कधीही कोणत्याही गोष्टींचे व्हिडीओ शूट करून ते शेअर करतात. असे लाखो व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होताना आपण पाहतो. त्यातील काही व्हिडीओंमध्ये लोक स्वतःचा जीव धोक्यात घालायला मागे-पुढे पाहत नाहीत. आजपर्यंत तुम्ही स्टंटचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे पाहिले असेल; ज्यात स्टंट करण्याच्या नादात लोकांनी आपला जीव गमावला आहे. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

हल्ली लोक सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळण्यासाठी विविध विषयांवर रील्स बनवतात. कित्येक जण त्यामध्ये आपली मर्यादा ओलांडतानाही दिसतात. कधी अश्लील नृत्य करून किंवा जीवघेणे स्टंट करून लोक जास्त व्ह्युज, लाइक्ससाठी हद्द पार करतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे. जे पाहून नेटकरी तीव्र संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
Accident of a man caught between two buses and crushed terrfying video viral on social media
याला म्हणतात नशीब! दोन मोठ्या बसमध्ये अडकला अन् चिरडला; पण पुढच्याच क्षणी चमत्कार झाला, पाहा थरारक VIDEO
Shocking video truck accident video instead of helping him some people started lotting his mobile money
माणुसकी मेली..! अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर वेदनेनं ओरडत होता अन् लोकांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल
pune viral video man break all traffic rules
पुणे पोलीस आहात कुठे? भररस्त्यात जोडप्याने अक्षरश: मर्यादा ओलांडली? VIDEO पाहून संतापले लोक
Cheating on petrol pumps bike are filled with water in mumbai kurla petrol pump video
VIDEO: धक्कादायक! मुंबईतील ‘या’ पेट्रोल पंपावर पेट्रोलच्या नावाखाली चक्क पाणी भरत होते; बाईक चालकानं कसं शोधून काढलं पाहा
Bhiwandi Live Accident at Rajiv Ghandhi Flyover shocking video
VIDEO: भिवंडीमधला थरारक लाईव्ह अपघात; कार चालकाचं नियंत्रण सुटलं अन् भयंकर घडलं, सांगा चूक नक्की कुणाची?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ट्रकचालक ट्रक चालविताना व्हिडीओ शूट करताना दिसत आहे. यावेळी तो ट्रक चालवता चालवता मधेच जागेवर उठून बाजूच्या दरवाजाने ट्रकच्या पुढच्या काचेवर लटकतो. ट्रकचालकाचा हा जीवघेणा स्टंट पाहून नेटकरी तीव्र संताप व्यक्त करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने “ड्रायव्हरसाठी दोन शब्द होऊ द्या”, असे लिहिले आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @royal_shetkarii या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत दोन लाखांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत.

हेही वाचा: “अरे बापरे, त्याने तिला चक्क…” माकडाबरोबरची मस्ती आली अंगलट; VIDEO पाहून व्हाल शॉक

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “पायताणाने हाणला पाहिजे.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “ड्रायव्हरकडे काही चूक नाही. व्हिडीओ काढणारा होता ना आत. त्यांच्या जीवावर निघून गेला होता तो.” आणखी एकाने लिहिलेय, “यमदेवाला सुट्टी आहे. तो त्याच्या गावाला गेला आहे.” आणखी एकाने लिहिलेय, “भाऊ, असे मजाक नका करत जाऊ.”

Story img Loader