Viral Video: लक्ष्मी विनयेन शोभते! पण काहींच्याबाबत हे प्रकरण अगदी उलट आहे. जितका जास्त पैसा गाठीशी असेल तितका माज व अहंकार काही व्यक्तींच्या वर्तणुकीतून पाहायला मिळतो यापूर्वीही शुल्लक कारणावरून काही बड्या साहेबांनी सोसायटीतील सुरक्षा रक्षकांना मारहाण केल्याचे, शिवीगाळ केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. यावेळेस तर या सर्व अपमानास्पद वागणुकीचा कळस सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नोएडाच्या एका उकच्भ्रू सोसायटीतील महिलेने इमारतीच्या वॉचमनला मद्यधुंद अवस्थेत अत्यंत हीन वागणूक दिली आहे. बरं त्या व्यक्तीचा दोष काय तर त्याने त्याचे काम केले! इतकेच…. नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊयात..
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, दीक्षा नावाची मद्यधुंद महिला एका सुरक्षा रक्षकाशी हुज्जत घालत आहे. तिने अचानक त्या माणसाची कॉलर धरली आणि त्याला जवळ ओढले इतकेच नव्हे तर त्याने घातलेली टोपी फेकून दिली. एवढं होऊनही हा वॉचमन एका शब्दाने महिलेला उलट उत्तर देत नव्हता उ;आत त्याने संयमाने आपले हात पाठी धरून महिलेकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण ही महिला नशेत इतकी बेभान झाली होती कि ती त्याच्या अगदी तोंडाजवळ जाऊन अर्वाच्य भाषेत बोलत राहिली.
दीशाचा मित्र व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसत आहे तर एक अन्य गृहस्थ माणूस सुरक्षा रक्षकाला संबोधून असे म्हणतो की, “पंकज तू स्तब्ध उभा राहा. तिला गैरवर्तन करू दे” हा दुसरा गृहस्थही आपल्या फोनमध्ये व्हिडीओ शूट करत आहे पण तो पंकज म्हणजेच वॉचमनच्या बाजूने बोलताना दिसत आहे. इतक्यात आणखीन एक व्यक्ती मध्यस्थी करून हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करताना आदिस्तोय पण हि महिला कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही.
पहा महिलेने वॉचमनशी केलेली गैरवर्तणूक
Video: श्रीमंतीचा अहंकार भोवला; मारहाण करणाऱ्या इमारतीच्या रहिवाश्याला सुरक्षारक्षकांनी अशी घडवली अद्दल की..
दरम्यान, हे सर्व प्रकरण समोर आल्यावर पोलिसांनी कारवाई करून अंजली आणि काकुळ या दोघांना अटक केली आहे. हे दोघे त्यावेळी दिशासह उपस्थित होते. अंजली ही दिशाची बहीण आहे. सुरक्षारक्षकाने महिलेविरुद्ध तक्रार केली असून सध्या दिशा बेपत्ता आहे.