Viral Video: मांजर आणि कुत्रा हे अनेकांचे आवडते प्राणी आहेत. त्यांचे या पाळीव प्राण्यांवर जीवापाड प्रेम असते. या पाळीव प्राण्यांना अनेकदा घरातील इतर सदस्यांपेक्षाही उत्तम वागणूक दिली जाते. त्यांची आवड-निवडही पूर्ण केली जाते. हल्ली या दोन्ही प्राण्यांचे वाढदिवसदेखील आवडीने साजरे केले जाताना दिसतात. अशा अनेक कौतुक सोहळ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. त्याशिवाय या लाडक्या प्राण्यांचे त्यांच्या घरातील अनेक मजेशीर व्हिडीओदेखील समाजमाध्यमांवर खूप व्हायरल होत असतात. परंतु, आता असा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक लहान व्यक्ती मांजरीबरोबर असं काही करताना दिसतेय, जे पाहून तुम्हीही शॉक व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगात जसे प्राणीप्रेमी असतात, तसे अनेक जण प्राण्यांचा तिरस्कारही करताना दिसतात. प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्या लोकांचेही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. काही लोकांबरोबर प्राण्यांचीदेखील खूप चांगली मैत्री असते; पण काही खोडकर व्यक्ती विनाकारण प्राण्यांना त्रास देताना दिसतात. या व्हिडीओमध्येदेखील असेच काहीतरी पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जण घरामध्ये बसून दारू पित आहे आणि तो दारूच्या नशेमध्ये मांजरीलादेखील दारू पाजायला सुरुवात करतो. यावेळी तो मांजरीला एका हाताने हातात पकडतो आणि दुसऱ्या हाताने मांजरीला दारू पाजतो. त्या व्यक्तीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @parivartan_news या अकाउंवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास लाखो व्ह्युज मिळाल्या आणि अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. त्यावर नेटकरीदेखील अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यामध्ये एका युजरने लिहिलेय, “कर्माचे फळ लगेच मिळेल”. दुसऱ्याने लिहिलेय, “याला आता वाघाला दारू पाजायला लावा पिंजऱ्यात टाकून”. तिसऱ्या एकाने लिहिलेय, “मांजरीला त्रास देऊ नको रे…” आणखी एकाने लिहिलेय, “तुझी अक्कल शेण खायला गेली का?”