Viral Video: सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून सोशल मीडियावर लग्नातील अनेक मजेशीर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा त्यात लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. त्याशिवाय हल्ली लग्नातील वधू-वराच्या एन्ट्रीचे व्हिडीओदेखील व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे; ज्यात वधू एन्ट्रीला हटके डान्स करताना दिसत आहे.
हल्ली लग्न म्हटलं की, वधू-वराचे प्री-वेडिंग फोटोशूट, लग्नातील लूक, त्यांची एन्ट्री या सर्व गोष्टींकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले असते. हल्ली सोशल मीडियामुळे या सर्व गोष्टी आपल्याला सहज पाहता येतात. त्याशिवाय बदलत्या काळानुसार लग्नातील प्रथांमध्ये झालेले बदलदेखील पाहयला मिळतात. पूर्वीच्या लग्नांमध्ये लग्नात या गोष्टींसाठी फारसे महत्त्व नव्हते. त्या काळी लग्नाचा मुहूर्त, परंपरा, प्रथा यांना अधिक महत्त्व दिले जायचे. पण, हल्लीच्या लग्नांमध्ये याच गोष्टी मोठ्या थाटामाटात पार पाडल्या जातात.
सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक वधू लग्नाच्या एन्ट्रीमध्ये ‘दुप्पटा तेरा’ या सलमान खानच्या चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी ही वधू खूप सुंदर स्टेप्स करताना दिसत आहे. त्याशिवाय लग्नात उपस्थित असलेली मंडळीदेखील डान्स पाहण्यासाठी आसपास उभे असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @vishakhamishra022 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर जवळपास ३८.४ मिलियन व्ह्युज आणि एक मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय या व्हिडीओवर युजर्सही अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “माझ्या आईनं अशी नाटकं पाहिली, तर ती चप्पल फेकून मारेल.” तर दुसऱ्या एकाने लिहिलेय, “माझ्या होणाऱ्या बायकोनं अशी नाटकं केली, तर मी तिला तिथेच सोडून जाईन.” तर तिसऱ्या एकाने लिहिलेय, “सिंगल राहीन; पण रील्स बनविणाऱ्या मुलीसोबत लग्न करणार नाही.” तर आणखी एकाने लिहिलेय, “आमचं लग्न कधी होणार; मीपण असाच डान्स करणार.”
हेही वाचा: क्या चोर बनेगा रे तू ! चोरी करायला आला अन् AC च्या हवेत झोपला; PHOTO पाहून माराल कपाळावर हात
पाहा व्हिडीओ:
दरम्यान, यापूर्वीदेखील लग्नातील अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते; ज्यात एका वधूने पतीने रसगुल्ला खाल्ला नाही म्हणून पतीच्या कानाखाली मारली होती. आणखी एका व्हिडीओमध्ये वधू वराला वरमाला घालताना, तर कधी मिठाई भरविताना वर-वधूमध्ये जबरदस्त हाणामारी पाहायला मिळाली होती.