अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा असंही घडतं की, जेथे अनेक लोक रस्त्यावरून वाहन चालविताना वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे मोठे व भीषण अपघात होऊन कधी कधी लोकांनाही जीव गमवावा लागतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका गाडीमुळे अनेक वाहनांचा अपघात होताना दिसत आहे. कसा ते पाहू या.
अपघाताचे आतापर्यंत तुम्ही बरेच व्हिडीओ पाहिले असतील. व्हिडीओ पाहून तुमचाही यावर विश्वास बसणार नाही. असं कसं शक्य आहे? असंच आश्चर्यचकित होऊन तुम्ही म्हणाल. असं नेमकं या अपघातात काय घडलं ते पाहूया. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक ई-रिक्षाचालक आंधळेपणाने रिक्षा चालविताना दिसत आहे. त्याच्या मार्गात जो येईल, त्याला चिरडत आहे.
नेमकं काय घडलं?
वास्तविक, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एक ई-रिक्षाचालक कसा आंधळेपणाने ई-रिक्षा चालवत आहे आणि समोरून येणाऱ्या प्रत्येकाला चिरडत असल्याचे दिसून येते. बाईक, सायकल, कार हा रिक्षाचालक कोणाकडे पाहत नाही. व्हिडीओच्या सुरुवातीला एक माणूस रिक्षाच्या मागे काठी पकडून धावत असल्याने होत असल्याचे दिसून येते. त्यानंतर रिक्षा मुख्य रस्त्यावर येते आणि एका कारला धडकून दुचाकीस्वाराला चिरडते. त्यानंतर, ई-रिक्षाचालक रस्त्यात सायकलस्वाराच्या अंगावर धावून जातो. त्यानंतर लोक त्याला पकडण्यासाठी त्याच्यामागे धावतात; मात्र ई-रिक्षाचालकाला कोणीही पकडले नाही आणि लोकांना चिरडून तेथून पळ काढला. त्यानंतर रिक्षा उलट होते आणि लोक त्या चालकाला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावतात.
(हे ही वाचा : बाईकपासून सायकलपर्यंत रस्त्यात सर्वांना ठोकत गेला ई-रिक्षा अन् नंतर पुढे जे घडलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल, पाहा व्हिडीओ )
व्हायरल व्हिडीओ येथे पाहा
@gharkekalesh नावाच्या X खात्यावरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत एक लाख १० हजारांहून अधिक वेळा पाहण्यात आले आहे. त्यामुळे या व्हिडीओला हजारो वेळा लाईक करण्यात आले आहे. त्यावर युजर्स कमेंट करीत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “ही एक मोठी समस्या बनली आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, भाऊ वास्तविक जीवनात जीटीए गेम खेळत आहे. तर, दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “भाऊ, तुम्ही वास्तविक आणि आभासीमधला फरक विसरलात.” अशा प्रकारचे प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. या प्रकारचे काही व्हिडीओ व्हायरलदेखील झाले आहेत. अशा चालकाच्या बेपर्वाईमुळे अनेकदा अपघात होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे मोठे नुकसानसुद्धा होऊ शकते. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओंच्या बाबतीत हेच घडले आहे.