Elderly Couple Love Video: जरी बहुतेक लोक प्रेमाला तरुणपणाशी जोडतात आणि मानतात की या वयात प्रेम सर्वात जास्त असतं, परंतु तो फक्त एक पैलू आहे. तरूणाईतल्या प्रेमापेक्षा म्हातारपणाच्या प्रेमात खूप मोठी ताकद असते, असं म्हणतात. आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या कपलचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील. पण या आजी-आजोबांच्या कपलचा व्हिडीओ काहीसा खास आहे. लग्नानंतरपासून वयाची साठी पार करून एकमेकांच्या साथीनं आयुष्य घालवल्यानंतर थकलेल्या आणि थरथर कापत असलेल्या हातांनी एकमेकांना सावरणाऱ्या या वृद्ध जोडप्यांचं प्रेम पाहून तुम्हीही भारावरून जाल.

प्रेमाला वय नसतं, असं म्हणतात. याचं प्रत्यक्षात उदाहरण देणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. हल्लीच्या काळाच लग्न टिकणं फार अवघड होऊन बसलं आहे, असं म्हणणाऱ्या लोकांपुढे या व्हिडीओनं प्रेमाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोण दिलाय. हल्लीच्या तरूण पिढीतील कपल्सना या व्हिडीओनं खूप काही शिकवलंय. या व्हिडीओमध्ये एक आजी-आजोबा एका अंगणात बसलेले दिसत आहेत.

आणखी वाचा : पाण्याखाली ‘मूनवॉक’ करणाऱ्या मुलाचा VIDEO VIRAL, परफॉर्मन्स पाहून थक्क व्हाल

आपल्या पतीला थकलेल्या हातांनी जेवण भरवताना दिसत आहेत. यादरम्यान एक वृद्ध महिला आपल्या पतीला प्रेमानं खाऊ घालताना दिसत आहे. ती तिच्या पतीला ज्या प्रकारे खायला घालते ते पाहून तुम्ही भावूक व्हाल. इतकं प्रेम तुम्ही कुठेच पाहिलं नसेल. असं प्रेम फक्त कथा, किस्सा आणि चित्रपटात आढळतं. दुसरीकडे, खऱ्या जीवनात असं प्रेम पाहून सोशल मीडिया यूजर्सचे मनही आनंदी झाले आहे. आपल्या थरथरत्या हातांनी आपल्या पतीला जेवण भरवताना पाहून प्रेमाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोण मिळतो. आयुष्यातल्या अवघड टप्प्यावर एकमेकांचा आधार बनलेले हे आजी-आजोबा लाखो लोकांच्या मनात घर करून बसले आहेत.

आणखी वाचा : शेकडो मगरींनी एकत्र येऊन शहरावर केला हल्ला? VIRAL VIDEO मुळे लोकांमध्ये दहशत

हा व्हिडीओ एकदा पाहिल्यानंतर मन भरत नाही म्हणून लोक वारंवार हा व्हिडीओ पाहताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे व्हिडीओ पाहिल्यानंतर तो आपल्या जवळच्या व्यक्तींना पाठवून ही भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवताना दिसत आहेत. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत साथ देणं हेच तर खरं प्रेम आहे, असे उद्गार सहज आपल्या तोंडून येतात.

आणखी वाचा : OMG! इतक्या उंच ताडाच्या झाडावर सरसर चढला अजगर! VIRAL VIDEO पाहून हैराण व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Taiwan Earthquake: भूकंपाचा कहर, ट्रेनही अगदी खेळण्यासारखी पटरीवर हादरली, पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ आयएएस अधिकारी सुमित्रा मिश्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. ‘प्रेम म्हणजे काय असं कुणी विचारलं तर सांग प्रेम या वयात असतं आणि आहे.’, अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ त्यांनी शेअर केलाय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ६ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत तर ३७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर प्रेम या भावनेबाबत आपली वेगवेगळी मत व्यक्त करताना दिसत आहेत.

Story img Loader