आयुष्यभर सर्व जण कष्ट करत असतात. आपल्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी धडपडत असतात. वयाच्या ६० व्या वर्षानंतर निवृत्त होतात आणि नातवंडांमध्ये गुंतून आपलं म्हातारपण घालवत असतात. पण काहींना वयाच्या साठीनंतरही जगण्यासाठी आणि कुटूंबाचं पोट भरविण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. असाच संघर्ष करणाऱ्या एका आजींचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. यात आजी कष्ट करून आपल्या पायावर उभ्या आहेत. स्वावलंबी जीवन जगत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्ही भावूक व्हाल, हे मात्र नक्की.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वयाची साठी ओलांडली की अनेकजण अंथरूणाला खिळतात किंवा आता आमच्याकडून धावपळ नाही होत असं म्हणत घरातला एक कोपरा पकडून म्हातारपण घालवातात. परंतु सध्या व्हायरल होत असलेल्या या आजीच्या जगण्याच्या स्पिरीटचं चांगलंच कौतुक केलं जात आहे. आपल्या थकलेल्या हातांनी मुंबई लोकलमध्ये चॉकलेट विकून आपलं पोट भरवतात. ते ही न तेही न दमता न थकता ह्या आजी दिवसभर लोकलमध्ये फेऱ्या मारत हे काम करतात. तुम्ही म्हणाल हे कसं होऊ शकतं ? चक्क साठी पार केलेल्या आजी कशी काय लोकलमध्ये फिरून चॉकलेट विकण्याचं काम करू शकतात? तर त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

आणखी वाचा : एक मगर रस्त्यावर साचलेल्या पाण्यात धावताना दिसली, जाणून घ्या VIRAL VIDEO मागचं सत्य

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : कुत्रा विरूद्ध पाणकुत्रा, पाहा कुणी मारली बाजी, हा गोंडस VIRAL VIDEO पाहून मन प्रसन्न होईल

अगदी तरूणांनाही लाजवेल असा स्पिरीट त्यांच्यामध्ये दिसून येतो. आजींचा हा उत्साह खरोखरंच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. ज्या वयात वृद्ध व्यक्ती आपलं आजारपण घेऊन दवाखान्याच्या फेऱ्या मारतात, त्याच वयात या आजीची स्वावलंबी जीवन जगण्यासाठीची धडपड आजच्या तरूण पिढीला नवी उर्जा देणारी आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : आणखी एका पाळीव कुत्र्याने घेतला चावा, लिफ्टमध्ये मुलगा कळवळत होता आणि मालक पळून गेला

हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण भावूक होताना दिसत आहे. सोबतच वयाच्या शेवटच्या टप्प्यातही हसत हसत संघर्ष करणाऱ्या आणि स्वबळावर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या आजींना सलाम करत आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : स्मार्टनेसच्या बाबतीत कुत्रेही काही कमी नाहीत, पाहा पायऱ्यांवरून कसा भरभर उतरला!

हा व्हिडीओ एका इन्स्टाग्राम यूजरने @mona13khan नावाच्या अकाउंटवरून शेअर केलाय. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागली. ‘त्या भीक मागत नाहीत… तर त्या मेहनत करत आहेत’. जमेल तेवढी मदत करा, अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत ५.५ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत आणि ६ लाख ६ हजार लोकांनी त्याला लाईक देखील केले आहे. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करत आजींचं कौतूक करताना दिसत आहेत.