आज १९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ४४ दिवसांच्या सात टप्प्यांत मतदान होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. देशभरातील ९७ कोटींहून अधिक पात्र मतदारांसह ही निवडणूक सर्वात मोठी ठरणार आहे. शिवाय उत्तरेकडील दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे ; यामध्ये अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम यांचा समावेश आहे.
त्यामुळे देशभरात लोकसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं प्रयत्न करीत आहे. उमेदवारांना निवडून देण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार कसा पोहचेल यासाठी पक्ष कोणतीही कसर सोडत नाही आहेत असे दिसून येत आहे. तर याच प्राश्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. कोणताही मतदार त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये म्हणून अरुणाचल प्रदेशात मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी निवडणूक कर्मचारी धाडसी कृत्य करताना दिसून आले आहेत. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ.
व्हिडीओ नक्की बघा…
तुम्ही व्हिडीओत पाहिलं असेल की, मतदान केंद्रावर पोचण्यासाठी कर्मचाऱ्यांनी अनोखं धाडस केदाखवलं आहे. अरुणाचल प्रदेशामधील निवडणूक अधिकारी मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी दोरीच्या सहाय्याने डोंगराच्या कडेकडेने प्रवास करीत आहेत. निवडणूक आयोगाने मतदार जागृतीसाठी डोंगर दऱ्यांचा मार्ग निवडून आणि स्वतःचा जीव धोक्यात घालण्याचे धाडस केलं आहे असे म्हणायला हरकत नाही.
१९ राज्ये, २ केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ मतदार लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या पहिल्या टप्प्यात आज १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. शिवाय, त्याच दिवशी उत्तरेकडील दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अरुणाचल आणि सिक्कीममधील ९२ विधानसभा मतदारसंघांसाठीही मतदान होईल. तर मतमोजणी २ जून रोजी होणार आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @IndianExpress यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.