Viralvideo: अनेक लोक आपल्या परिस्थितीवर नाराज असतात. त्यांना सतत दुसऱ्यांच्या राहणीमानाचं आणि त्यांच्या आरामदायी जीवनाचं कौतुक वाटतं. शिवाय श्रीमंत मित्रांच्या तुलनेत आपण खूपच कमी असल्याची तक्रार ते खासगीत करत असतात. मात्र, आपल्या आजुबाजूला काही लोक असेही असतात जे कोणत्याही तक्रारी न करता आयुष्याचा पुरेपूर आनंद घेतात. अशाच एका आजोबांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आयुष्यात प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद शोधला की समाधान आपोआप मिळतं हे दाखवणारा हा व्हिडीओ आहे. यामध्ये हे आजोबा आपल्या मित्रांसोबत कट्ट्यावर डान्स करत आहे. त्यांचं शरीर थकलं असलं तरी त्यांच्यातला उत्साह हा तरुणांना लाजवेल असाच आहे. त्यांचा हा एकच नाहीतर अनेक व्हिडीओ आहेत. या वयात दुखण्यानं रडत बसण्यापेक्षा हे आजोबा आपल्या मित्रमंडळींसोबत छान डान्स करत आहेत. आपल्यासोबतच इतरांनाही ते नाचवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून सर्वच आजोबांचं कौतुक करत आहेत.

आजचाच दिवस शेवटचा, क्या पता कल हो ना हो..असं म्हणते हे आजोबा त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा पुरेपुर आनंद घेत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Video: आला अंगावर घेतलं शिंगावर; चवताळलेल्या बैलाशी मस्ती करणं अंगलट, तरुणाला थेट…

kharotevijay नावाचं इन्स्टाग्राम अकाऊंट हे आजोबा स्वत: हँडल करत असून यावर रोज यावर वेगवेगळे व्हिडीओ ते शेअर करत असतात. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video elederly man dance you will definitely go speechless seeing admirable enthusiasm at this age srk