हत्तींमध्ये अफाट शक्ती असतो. कदाचित यामुळेच जंगलाचा राजा सिंहही त्याच्याशी पंगा घेण्यापूर्वी दहा वेळा विचार करतो. जेव्हा त्याला राग येतो तेव्हा तो सगळीकडे विध्वंस कर
तो. इतकंच नाही तर काही वेळा ते रागाच्या भरात माणसांवर हल्ला करू शकतात. जर तुम्हाला हत्तीचा राग आणि त्याची शक्ती माहीत नसेल तर ती जाणून घेता येऊ शकतो. कारण आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाला. या व्हिडीओमध्ये पाठीला खाज सुटल्याने चवताळलेल्या हत्तीचा राग आणि ताकद दोन्ही पाहायला मिळत आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, की जंगलात फिरणारा हत्ती एका हिरव्या झाडाजवळ पोहोचतो आणि झाडाला सोंडेने खाली ओढण्याचा प्रयत्न करू लागतो. हत्ती आपल्या सोंडेने झाडाला ढकलत आहे. जोरजोरात धक्का देऊन हा हत्ती झाडाला खाली पाडतो. त्यानंतर हत्ती जे काही करतो ते पाहून तुमचं हसू आवरणार नाही. झाडाला खाली पाडून हा हत्ती त्या झाडाजवळ जातो आणि आपली पाठ खाजवू लागतो.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : अजगर माकडाला गिळणारच होता, तितक्यात माकडसेनेनं काय केलं पाहा
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : मिशिगन लेकमधील ढगांचा जुना VIDEO VIRAL, निसर्गाचा असा चमत्कार पाहून व्हाल हैराण
या हत्तीच्या अंगाला खाज सुटली होती. खाज सुटल्यामुळे हत्तीला प्रचंड राग येत होता आणि म्हणूनच त्याने झाड जमिनीवर टाकले. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रेडिटवर शेअर केलाय. OckhamsKatana नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात पाहत आहेत. लोक या व्हिडीओचा आनंद घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.