मानव आणि प्राणी यांचं नातं खरोखरंच अनोखं आहे. दोघांच्या मैत्रीच्या अशा अनेक कहाण्या सांगणारे व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. या व्हिडीओने सगळ्यांचंच मन पिघळून जातं. जसा माणूस आपल्या जगात सुखी असतो, त्याचप्रमाणे प्राण्यांनाही जंगलात राहायला आवडतं. पण प्राणी हा माणसाचा सर्वात चांगला आणि जवळचा मित्र आहे. हे सत्य सिद्ध करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण भावून होताना दिसून येत आहेत. गेल्या एक वर्षापासून हत्ती त्यांच्या मालकाला भेटले नव्हते. पण जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा मात्र या हत्तींचा आनंद गगनात मावेनासा झाला. हत्तीच्या मालकाला त्याचे डोळे आणि नशीब यावर विश्वासच बसत नव्हता. हा व्हिडीओ एकदा पाहाच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ @buitengebieden_ नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शन देखील देण्यात आलीय. १४ महिन्यांनंतर जेव्हा काही हत्ती त्यांच्या मालकाला भेटले, तेव्हा असे दृश्य होते.” या व्हायरल व्हिडीओमध्ये एका डोंगराळ भागातून नदी वाहताना दिसून येत आहे. अगदी दूरवरून तीन हत्ती नदीच्या पाण्यातून वाट काढत चालय येताना दिसून येत आहेत. दुसरीकडे नदीतच एक व्यक्ती उभा असल्याचं दिसून येत आहे. डेरेक थॉम्पसन असं या व्यक्तीचं नाव आहे. नदीतून दूरवरून येणारे हत्ती या व्यक्तीच्या दिशेने चालत येताना दिसून येत आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : आता सायकल चालवून तुम्ही बनवू शकता फळांचा रस! कसं ते पाहा…

मालकाला पाहून हत्तीने मिठी मारली
हत्तींचा कळप पाहून त्यांचा मालक मोठ मोठ्याने आवाज देताना दिसून येत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हत्ती इतक्या दुरून आपल्या मालकाचा आवाज ओळखतात आणि तिथूनच आपली सोंड वर करून गर्जना करू लागतात. मालकाला पाहताच ते आणखी वेगाने चालत येतात आणि पटकन मालकाकडे येण्याचा प्रयत्न करतात. काही क्षणात ते धावत त्या मालकाकडे येतात आणि त्याला प्रेमाची घट्ट मिठी मारतात. हत्ती त्याच्या सोंडेने मालकाच्या डोक्याला स्पर्श करतानाही दिसत आहे.

आणखी वाचा : कागदी विमानाप्रमाणे टीनचे छप्पर उडून कारवर कोसळले, ऑस्ट्रेलियामधल्या वादळाचा VIDEO VIRAL

इथे पाहा हा भावूक व्हिडीओ :

आणखी वाचा : हिवाळ्यात बाहेर अंघोळ करण्यासाठी मुलाने शोधला हा कमालीचा जुगाड, VIRAL VIDEO पाहून थक्क व्हाल!

थायलंडच्या अभयारण्याचा आहे व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडला आहे की आतापर्यंत या व्हिडीओला काही दिवसातच ३७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओला १ लाखाहून अधिक लोकांनी लाईक सुद्धा केलंय आणि २५ हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केलं आहे. या व्हिडीओमधील मालक डेरिकने टोरोंटो यांनी अग्निशामक म्हणून नोकरी सोडून हत्तींचं पालनपोषण करण्यात आपलं आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ते थायलंडमधील एका अभयारण्यात हत्तींसोबत राहतात. हे अभयारण्य त्यांच्या पत्नी लेक यांनी सुरू केलं आहे.

थायलंडच्या एलिफंट नेचर पार्कमधला हा भावूक प्रसंग आहे. हत्तींना इतर घातक हत्तींपासून वाचवलं जातं आणि फिरण्यासाठी त्यांना पुरेशी जागा देऊन त्यांचें पुनर्वसन केलं जातं. हत्तींच्या या गोड मिठीने लोकांना भावूक केलंय, हे मात्र नक्की.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video elephant meets its caretaker after 14 months people get emotional after watching the video of human and elephant reunion prp