हत्तींचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. हत्तींचा कळप, त्यांच्या छोट्या छोट्या पिल्लांचे मजेशीर व्हिडीओही आपलं लक्ष वेधून घेतात. आजकाल लोक आपल्या बिझी शेड्यूलमधून थोडा वेळ काढून त्याचा आनंद लुटताना दिसतात. काही लोक वीकेंडला कुटुंबासोबत मजा करताना दिसतात, तर काहीजण जंगल सफारीचा आनंद घेण्यासाठी जंगली अभयारण्यात जातात. अशा वेळी लोक वन्यप्राण्यांच्या सान्निध्यात घालवलेले क्षण सोशल मीडियावर शेअर करतात. अशाच एका व्हिडीओने सध्या लक्ष वेधलं आहे. हत्तींचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतो आहे. सध्या असाच एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. ज्यामध्ये एक महाकाय जंगली हत्ती जंगल सफारीचा आनंद लुटणाऱ्या फोटोग्राफरसोबत मस्ती करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जंगलात राहणारे हत्ती खूप मोठे आणि रागीट असतात. मात्र या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, याउलट हा हत्ती एकदम शांत आणि लोकांशी मैत्रीपूर्ण वागताना दिसतो. व्हिडिओमध्ये, हा हत्ती वन्यजीव फोटोग्राफरने घातलेली टोपी आपल्या सोंडेनं उचलून घेतो. यानंतर तो ही टोपी स्वतःच्या डोक्यावर ठेवण्याचा प्रयत्न करतो. या टोपीसोबत काही वेळ खेळल्यानंतर हत्ती अगदी शांतपणे ही टोपी पुन्हा फोटोग्राफरच्या डोक्यावर ठेवून देतो.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – शेकडो फूट उंचावर स्टंट करत होता तरुण; एक चूक अन्…Video पाहून येईल अंगावर काटा

या व्हिडिओला सोशल मीडियावर 3.2 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आणि एक लाख 10 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.  तर अनेत प्रतिक्रिया नेटकरी व्हिडीओवर देत आहेत.